मुंबई-ठाकरे यांच्या ओरिजनल शिवसेनेशी भाजपने बेईमानी केली. आणि आज याच गोष्टीची परिणीती म्हणजे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. महाविकास आघाडीला मोरल बुस्ट मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, कसब्यातील विजय हा जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे. महाविकास आघाडीला मोरल बुस्ट मिळाला आहे. भाजप जोपर्यंत ओरिजनल शिवसेनेसोबत होती. तोपर्यंत कसब्यामध्ये त्यांचा विजय झाला. मात्र जेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत बेईमानी केली. तेव्हा ही ओरिजनल शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या बाजूने उभी राहिली. आणि आज याच गोष्टीची परिणीती आहे. रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करते.