जळगाव-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणालेकी, काही लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्या हवेच्या जोरावर हे फुग्यासारखे हवेत गेले आहेत. त्या फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हा सर्वांना करायचे आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार डगमगायला लागले आहे. केंद्र सरकार हालायला लागले आहे. मला माझ्या महापौर आणि उपमहापोरांसह इतर सहकाऱ्याचा अभिमान आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे, नाव लावून कुणी काही करु शकेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता आली काय गेली काय? मी सत्तेसाठी धडपडत नाही. देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्न मला पडत नाही. जागे करण्याचे काम मला वंश परंपरेने आले असल्याचे ठाकरे म्हणाले. ते पुढं म्हणाले की, सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. 25 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जावून शिवसेनाची काँग्रेस होऊ देणार नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा हिंदू खतरेमें अशा घोषणा देत होते. आता यांचे नऊ वर्षे सरकार आहे तरी यांना कश्मीरमधील हिंदू पंडीतांना परत आणता आले नाही. आता तर यांना यांचे सरकार नव वर्षे असताना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतोय हे दुर्देव असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जरांगेंना भेटायला वेळ नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतू मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जळगावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तिखट भाषेत टीका केली आहे. आम्ही आमची काँग्रेस होऊ देणार नाहीच, पण भाजपा कमळाबाईची पालखी देखील वाहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
भाजपने सरदार पटेल यांचा पुतळा उभारला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना चोरले. अगदी माझे वडील देखील त्यांनी चोरले. भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.