जळगाव-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात सभा घेत आहेत. या निमित्त जळगाव जिल्ह्यात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राज्यात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते, अशी एका प्रकारे त्यांनी कबुली दिली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी आता राजीनामा देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एका प्रकारे अन्याय होणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांची सरकारने चौकशी करावी. त्या आरोपांवर आधी उत्तर द्या. पंतप्रधानी त्या आरोपांची वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. नसता असे आरोप करु नये, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे.
अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असून त्याकडे आतापासून सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. गावात पाण्याचा पुरेसा साठा नाही, त्यात लोड शेडींगची समस्या देखील चिंताजनक ठरत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे.
या वर्षी हवा तेवढा पाऊस पडला नाही. पाऊस नसल्याने राज्याची स्थिती चिंताजनक, अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे आशा निर्माण झाली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यासह अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. विमा कंपन्यांमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवी तशी आवश्यक बाजारपेठ उपलब्ध नसल्याचे शरद पवार म्हणाले.