पुणे : 24 डिसेंबरला होणाऱ्या मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.अर्थात पवारांच्या सन्मानासाठी पुण्याच्या महापौरांना लढा द्यावा लागला त्यानंतर रस्त्र्वाडी भाजपा मधील हा वाद शमला असल्याचे तूर्तास तरी दिसते आहे .
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमीपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं महापौरांकडून सांगण्यात आले आहे.२३ च्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका प्रिंट करण्याची दिलेली ऑर्डर मागे घेण्यात आल्याचे त्यांनी दुपारी स्पष्ट केले
शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला सन्मानपूर्वक न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमीपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी काल दिला होता.
परंतु मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने 23 डिसेंबरचा भूमीपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द केल्याने, आता पवार-मोदी व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत.