किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!
मुंबई-भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्य्यावरून आता सत्ताधारी विरुद्ध भाजपा असा नवा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोमय्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत भाजपावर टीका टिप्पणी सुरू केली आहे. एवढच नाहीतर या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीसही प्राप्त झाली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर संताप व्यक्त करत, जोरदार टीका केली आहे.
“मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!” असं देवेंद्र फडणीस यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.