मुंबई: आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरुवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले, पण आपण नैतिकता सांभाळत बसलो, पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत आयोजित केला होता. त्यामध्ये ते बोलत होते.
जे शिवसेनेच्या अंगावर आले, त्यांना डम्पिंगमध्ये फेकून दिले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. मुंबईत शिवसेनेच्या सोशल मिडीयाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ताकद शिवसेनेचे आहे, आणि शिवसेनेचीच राहणार असे म्हणत विरोधकांना थेट इशारा दिला आहे. तर सोशल तितकेच काम करा असा टोला राणा दाम्पत्याला लगावला आहे.
बाळासाहेबांचा फेस हेच त्यावेळचे देशाचे राजकारण होते. ते तरूणाचे नेते होते, त्यामुळेच देशातील सर्व भाषांमध्ये सामनाचे अनुवादन करावे लागते. शिवसेना ही देशातील राजकारणाचा ब्रँड आहे. असे म्हणत शिवसेनेची ताकद कुणी विसरू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
हिटलरच्या आणि मोदींच्या प्रचारात साम्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलर यांच्या प्रचारात अनेक साम्य आहे. मोदी पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात असा दावा संजय राऊतंनी केला आहे. हिटलरच्या काळातही विरोधकांना बदनाम करण्यात येत होते. तर आताही विरोधकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. हिटलर प्रमाणे मोदीही अनेक इव्हेंट करतात. असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केला आहे.
नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार
उत्तर प्रदेशात भाजपकडून विषारी प्रचार करण्यात आला. मात्र तुम्ही निवडणुकांच्या वेळेस नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. राहूल गांधींची प्रतिमा मलिल करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. गेली अनेक दिवस विरोधी पक्षांच्या विरोधातील पोस्ट करण्यासाठी पैसै दिले जातात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जाणारच
आयएनएस घोटाळा प्रकरणात भाजपचे नेते करीट सोमय्या यांनी पैसा गेाळा केला आणि तो कुठे गेला याची काही माहिती नाही. असे म्हणत त्या प्रकरणात कोर्टाने सध्या जामीन दिला असला तरी ते न्यायालयात जाणारच असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शिवसेना नेते संजय राऊत
- सुशांतसिंग, कंगना राणावत प्रकरणात आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले.
- गांधीजींनी परदेशी कापडांची होळी केली. गांधींजींचे नारे त्यांची शब्दांची रचना लोकांना पटकन पटणारी होती.
- बाळासाहेब ठाकरे हे तरूणांचे नेते होते
- आपल्या चेहऱ्यावर पराभव दिसणे, हाच आपला पहिला पराभव
- महाराष्ट्रात शिवसेनेशी लढणे तितके सोपे नाही
- आम्हाला जे करायचे ते आम्ही केले, म्हणून 170 आमदार शिवसेनेच्या पाठिमागे उभे राहिले
- असली नकली ठाकरे कोण हे लोकांना माहितीये, आणि तशी पोस्टर जनतेने जावली आहेत
युवासेनेच्या सोशल मिडीयाच्या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी मनसे, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरमध्ये बरेच साम्य असल्याचा टोलाही लगावला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हे नकली ठाकरे असून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच असली आहेत असे पोस्टर जनतेने आयोध्येत लावले आहे. अशी जहरी टीका राज ठाकरेंवर केली आहे.