पुणे-तुम्ही पुण्याचे पालकमंत्री म्हणून येणार आहेत, तसेच लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही, मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती मात्र, आता या भेटीबाबत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत भेट झाल्यांच्या चर्चांना विराम दिला आहे. त्यांच्याशी अशी कुठलीही भेट झाली नाही असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. तसेच मंत्री मंडळाच्या विस्तरा बाबत विचारले असता, मंत्री मंडळ विस्तार लवकरच होईल असेही ते म्हणाले.पुणे हे पहिलं शहर झालं पाहिजे जेथे शंभर टक्के अपारंपारिक स्त्रोतांतून मोबिलीटी करता आली पाहिजे. ६५० बसेस झाल्यानंतर पुणे देशामध्ये आग्रणी होणार आहे, असे देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं.पुणे शहराचं विभाजन करून नवीन महापालिका झाली पाहिजे का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले की नवीन वादाचे विषय कशाला काढता जेव्हा करायचं तेव्हा पाहू. सध्या राज्य सरकारसमोर असा प्रस्ताव नाही, भविष्यात येऊ शकतो असे सांगत फडणवीसांनी या विषयावर बोलणे टाळले.