मुंबई : “जयंतराव मला काल तुम्ही मुख्यमंत्रिदाची ऑफर दिली,दादांना विचारलं का तुम्ही ?तुम्हाला विरोधी पक्षनेता व्हायचं होतं , पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख काल तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कालच्या जयंत पाटलांच्या भाषणाला तोडीस तोड उत्तर दिलं.दादा दादा आहेत , त्यांची दादागिरी चालणार , ते आमचे मित्र आहेत