पुण्यातील रमेश बागवेंसह कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण ,अशोक चव्हाण ,बाळासाहेब थोरातांसह ६० उमेदवारांची नावे निश्चित
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी.काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे.यामध्ये पुण्यातील कन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात रमेश बागवे तर कराड मधून पृथ्वीराज चव्हाण भोकर मधून अशोक चव्हाण ,संगमनेर मधून बाळासाहेब थोरात लातुरातून अमित देशमुख यांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .काँग्रेसकडून एकूण 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .
काँग्रेसचे पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवार
संजय जगताप (पुरंदर)
रमेश बागवे (पुणे कन्टोन्मेंट)
पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड)
अशोक चव्हाण (भोकर)
प्रणिती शिंदे (सोलापूर)
अमित देशमुख (लातूर शहर )
बाळासाहेब थोरात (संगमनेर)
यशोमती ठाकूर (तिवसा)
नितीन राउत (नागपूर उत्तर)
मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर)
पी.एन.पाटील (करवीर)
पद्माकर वळवी (शहादा)
शिरीष नाईक (नवापूर)
ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
विश्वजित कदम (पलूस कडेगाव )
कल्याण काळे (फुलंब्री)
अमीन पटेल (मुंबादेवी)