मुंबईः विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत ५१ जणांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत व ज्या जागेबद्दल वाद नाही अशा मतदारसंघाचा या यादीत समावेश असल्याचे दिसत आहे.
यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, रमेश बागवे ,प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, काँग्रेसचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी येथून, सोलापूर शहर मध्यमधून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे तर लातूर शहरमधून अमित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मतदारसंघात ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली होती. त्यानंतरच काँग्रेसचे उमेदवार ठरले होते. शिवाय शनिवारी कॉंग्रेस राष्ट्रवादीची देखील बैठक झाली होती.
काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यापुढील कंसात मतदार संघ पुढील प्रमाणे –
1. अॅड. के.सी. पडावी (अक्कलकुवा)
2. पद्माकर विजयसिंह वळवी (शाहदा)
3. शिरीष स्वरूपसिंह एच. नाईक (नवापूर)
4. शिरीष मधुकरराव चौधरी (रावेर)
5. हर्षवर्धन वसंतराव सपकाळ (बुलढाणा)
6. अनंत सखाराम वानखेडे (मेहकर)
7. अमित सुभाषराव झनक (रिसोड)
8. विरेंद्र वाल्मिकराव जगताप (धामणगाव रेल्वे)
9. अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (तिओसा)
10. अमर शरद काळे (आर्वी)
11. रणजीत प्रताप कांबळे (देवळी )
12. सुनिल छत्रपाल केदार (सावनेर)
13. डॉ. नितीन राऊत (नागपूर नॉर्थ)
14. विजय नामदेवराव वडट्टीवार (ब्रम्हपुरी)
15. सतीश मधुकर वारजूरकर (चिमूर)
16. प्रतिभा सुरेश धानोकर (वर्धा)
17. अनिल उर्फ बाळासाहेब मानगुरूकर (यवतमाळ)
18. अशोक शंकरराव चव्हाण (भोकर)
19. डी.पी. सावंत ( नांदेड उत्तर)
20. वसंतराव बळवंतराव चव्हाण (नायगाव)
21. रावसाहेब जयवंत अनंतपूरकर (देगलूर)
22. संतोष कौतुका तारिफ (कळमनुरी)
23. सुरेश अंबादास वरपुडकर (पार्थी)
24. डॉ. कल्याण वैजीनाथ काळे (फुलंब्री)
25. शेख असिफ शेख रशिद (मालेगाव मध्य)
26. रोहित चंद्रकांत साल्वे (अमरनाथ)
27. सय्यद मुज्जफर हुसेन (मिरा भाईंदर)
28. सुरेश हिराचंद्र कोपरकर (भांडूप वेस्ट)
29. अशोक भाऊ जाधव (अंधेरी वेस्ट)
30. मोहम्मद आरिफ नसीम खान (चांदिवली)
31. चंद्रकांत दामोदर हांडोरे (चेम्बुर)
32. झिसान जियाऊद्दीन सिद्दीकी (बांद्रा पुर्व)
33. वर्षा एकनाथ गायकवाड (धारावी)
34. गणेश कुमार यादव (सायन – कोळीवाडा)
35. अमिन अमिरअली पटेल (मुंम्बादेवी)
36. अशोक अर्जुनराव जगताप (कुलाबा)
37. माणिक मोतीराम जगताप (महाड)
38. संजय चंद्रकांत जगताप (पुरंदर)
39. संग्राम अनंतराव थोपटे (भोर)
40. रमेश आनंदराव बागवे (पुणे कॅन्टोन्मेंट)
41. बाळासाहेब थोरात (संगमनेर)
42. अमित विलासराव देशमुख (लातूर)
43. अशोक शिवाजीराव पाटील – निलंगेकर (निलंगा)
44. बसवराज माधवराव पाटील (औसा)
45. मधुकरराव देवराम चव्हाण (तुळजापूर)
46. प्रणिती सुशिलकुमार शिंदे (सोलापूर मध्य)
47. मौलाबी बासुमियाँ सय्यद (सोलापूर दक्षिण)
48. ऋतुराज संजय पाटील (कोल्हापूर दक्षिण)
49. पी.एन. पाटील साडोळीकर (करवीर)
50. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम (पलूस-केडगाव)
51. विक्रम बाळासाहेब सावंत (जत)