नाव : श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
जन्म : 15 ऑक्टोबर 1947.
जन्म ठिकाण : नाशिक.
शिक्षण : एल.एम.ई.(आय).
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मीना.
अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा).
व्यवसाय : शेती.
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मतदारसंघ : 119-येवला, जिल्हा नाशिक.
इतर माहिती : संस्थापक अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई माजी विश्वस्त, व्ही. जे. टी. आय. संस्था, मंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसारः माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट : 1985 “देवत” व 1990″ नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती; 1973 सदस्य, 1973-84 विरोधी पक्षनेते, 1985 व 1991 महापौर, मुंबई महानगरपालिकाः 1991 अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स; 1991 पर्यंत शिवसेनेत, 1991 नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत, जून 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य संस्थापक सदस्य व जून 1999 ते नोव्हेंबर 1999 महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः 1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-19 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.
1996-2002 व 2002-2004 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; डिसेंबर 1991 ते मार्च 1993 महसूल खात्याचे मंत्री; मार्च 1993 ते मार्च 1995 गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; 1996 – 1999 विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद; ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, जानेवारी 2003 ते डिसेंबर 2003 उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर 2004 ते ऑक्टोबर 2009 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)