7500 मतांनी समाधान औताडे विजयी
पंढरपूर-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल जाहीर होत आहे. राष्ट्रवादीच्या भालकेंना पराभूत करुन भाजपचे समाधान औताडे विजयी झाले आहेत.सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान औताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.
विजयानंतदेखील र पंढरपुरात कोरोना नियम धुडकाउन लावल्याचे दिसून आले. भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात आहे. समाधान औताडे यांची विजयी मिरवणूक काढलेल्याचे चित्र पंढरपुरात दिसत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे येथे सध्या मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आलेले होते. जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र विजयानंतर हे नियम पाळले नसल्याचे दिसत आहे.