मुंबई, दि.२५ जानेवारी-किरिट सोमैय्या मंत्रालायत एका अधिकाऱयांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ज्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली ती निषेधार्थ आहे.अशा प्रकारची कारवाई करणे म्हणजे मोगलाई पद्धतीचा कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
सरकार कोणाच्या मालकीचे झाले आहे का..तुम्हाला आली लहर आणि तुम्ही त्या अधिकरायला सस्पेंड करणार का… यापूर्वी कुठला नेता मंत्रालयात जाऊन कुठल्या खुर्चीवर बसला नाही का… असा सवाल करतानाच सरकारचा हा अतिरेकी कारभार असून आम्ही याचा धिक्कार करतो असे दरेकर यांनी सांगितले.
