पियाजिओकडून आपल्या नवीन “परफॉर्मन्स रेंज”चे अनावरण

Date:

पुणे: पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) या इटालियन पियाजिओ ग्रुपच्या १०० टक्के मालकीच्या तसेच भारतातील छोट्या वाणिज्यिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज बीएसVI श्रेणीतील सर्व उत्पादनांचे प्रदर्शन केले. डिझेल आणि पर्यायी इंधन श्रेणीतील “दि परफॉर्मन्स रेंज”, या नावाने ओळखली जाणारी ही संपूर्ण श्रेणी प्रदर्शनात मांडण्यात आली होती. डिझेल रेंजमध्ये नवीन शक्तिशाली ५९९ सीसी इंजिन असून त्यातून ७ किलोवॅट शक्ती आणि २३.५ एनएम टॉर्क मिळतो. हे इंजिन ५-स्पीड गिअर बॉक्स आणि नवीन अॅल्युमिनियम क्लचसह असून ते भार वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवून ट्रिपचा वेळ कमी करते. सुधारित कार्गो रेंजमध्ये एक मोठे केबिन येते आणि त्यातून अधिक चांगली हेडरूम तसेच चालकासाठी जास्त जागा मिळते आणि त्याची उत्पादकता वाढवते. प्रवासी श्रेणीमध्ये प्रवाशांसाठी नवीन सुरक्षा दरवाजेही आहेत. पर्यायी इंधन श्रेणीमध्ये उद्योगातील सर्वाधिक सुधारित ड्राइव्ह ट्रेन असून त्यात २३०सीसी ३ व्हॉल्व्ह हायटेक इंजिनही आहे. ग्राहकांना शहरात प्रवास करताना एक चांगली, कमी आवाजाची राईड चांगल्या गाडी चालवण्याच्या क्षमतेसह मिळू शकते.


या प्रदर्शनासोबत पियाजिओकडे कार्गो आणि प्रवासी वाहतूक उपयोजनासाठी भारतातील शेवटच्या टप्प्यातील मोबिलिटीसाठी सर्वांत मोठी उत्पादन श्रेणी आहे. ही कार्गो श्रेणी ५, ५.५ आणि ६ फुटांच्या डेक लांबीमध्ये तसेच डिलिव्हरी व्हॅन आणि हाय बॉडी पर्यायांत उपलब्ध आहे. प्रवासी श्रेणी लहान बॉडी, मध्यम बॉडी, रूंद बॉडी आणि जादा रूंद बॉडी प्रकारात उपलब्ध आहे. ही श्रेणी इंधनबचतीसाठी उपयुक्त असून त्यातील उत्पादने डिझेल, सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोलमध्ये उपलब्ध आहेत.

या कंपनीने बीएस VI उत्पादनांच्या किमतींचीही घोषणा केली असून डिझेल रेंजची एक्स शोरूम किंमत ४५,००० रूपयांनी जास्त आहे आणि पर्यायी इंधन श्रेणीची किंमत इतर समकक्ष बीएस VI उत्पादनांच्या तुलनेत १५,००० रूपयांनी जास्त आहे.
या उत्पादनांबाबत बोलताना पीव्हीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिएगो ग्राफी म्हणाले की, ”आम्हाला आमच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीसह भारतातील बीएसVI ने सज्ज पहिली ३-चाकी उत्पादक कंपनी होताना खूप आनंद होत आहे. आम्ही आमची बीएसVI निकषांनुसार उत्पादनाची तयारी खूप आधीपासून सुरू केली होती आणि त्यामुळे आज आम्ही बीएसIV वरून बीएसVI मध्ये रूपांतरणासाठी खूप चांगल्या पद्धतीने सज्ज आहोत.”

या निमित्ताने बोलताना पीव्हीपीएलचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीव्ही व्यवसायाचे प्रमुख श्री. संजू नायर म्हणाले की, ”नवीन बीएसVI “परफॉर्मन्स रेंज” कंपनीच्या नावीन्यपूर्णता व तंत्रज्ञानातील नेतृत्वावर भर देते आणि अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या प्रवासासाठी उत्तम दर्जाच्या उपाययोजना देते. आमची “पॉवर मॅक्स” डिझेल श्रेणी आमच्या ग्राहकांना अधिक चांगला भार वाहून नेण्याची क्षमता तसेच वेगवान प्रवासाचा कालावधी यांच्यामुळे जास्त उत्पन्नाची संधी देईल. त्याचवेळी आमची ४२ महिन्यांची वॉरंटी तसेच सुधारित देखभाल कालावधी यांच्यामुळे ग्राहकाचा खर्च खूप कमी होईल. तसेच “स्मार्ट” एएफ श्रेणी हा उत्तम पिकअप, एनव्हीएच आणि नागरी वाहनचलनक्षमता यांच्यासाठी एक मानक आहे. ३६ महिन्यांची वॉरंटी आणि खास सुपर सेव्हर मेन्टेनन्स स्कीम यांच्यामुळे देखभालीचा खर्च कमी होण्याची हमी मिळत असून ही आमच्या ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने स्मार्ट निवड आहे.”
या निमित्ताने बोलताना पीव्हीपीएलचे मार्केटिंग, प्रॉडक्ट मार्केटिंग आणि चॅनल मॅनेजमेंट, सीव्ही व्यवसायाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मलिंद कपूर म्हणाले की, ”बीएसVI श्रेणी लवकर बाजारात आल्यामुळे आम्हाला बाजारातील साठा व्‍यवस्थित राखता येईल. तसेच १ एप्रिल २०२० पूर्वी रूपांतरण चांगल्या पद्धतीने करता येईल. डिझेल कार्गो विभागात आम्ही कायमच बाजारात आघाडीवर राहिलो आहोत आणि मला खात्री आहे की आमचे नव्याने बाजारात आलेले पॉवर मॅक्स-५९९ सीसी बीएसVI वाहन हे आमचे स्थान आणखी मजबूत करेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...