Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांसोबत उपक्रमांचे आयोजन

Date:

पुणे, दि. 8: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, तरी सदर राज्यस्तरीय उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
सदर राज्यस्तरीय उपक्रमामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा आहे. मताधिकार हा १८ वर्षावरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पड़ता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर या स्पर्धेची नियमावली देण्यात आलेली आहे.
राज्यस्तरीय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेची नियमावली
१. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
२. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे
२.१ सदर विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनातून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
२.२ सदर फोटो मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन,असे अधिकचे काही जोडू नये.
२.३ प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त २०० KB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. पाचही फोटोंची एकत्रित साइज १mb पेक्षा जास्त असू नये
२.४ आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना ती कमीत-कमी ३० सेकंदाची आणि जास्तीत जास्त एक मिनिटाची पाठवावी.
२.५ चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना मूळ रूपात आहे त्या स्वरूपात पाठवावी कोणत्याही प्रकारे संपादित (एडिटिंग) करू नये. चित्रिकरण करताना देखाव्याचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
२.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत जास्त १०० mb असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी.
३ स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर पाच फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
४. आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.
५. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी श्री. अविराज मराठे ७३८५७६९३२८, श्री प्रणव सलगरकर ८६६९०५८३२५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश ( मेसेज ) पाठवून कळवावे.
६. दिनांक १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल
अ. प्रथम क्रमांक: २१,०००/
ब. द्वितीय क्रमांक :- ११,०००/
क. तृतीय क्रमांक :- ५,०००/
ड. उत्तेजनार्थ:- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे
८ सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती याच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.
९. आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
१०. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.

  1. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

तसेच, या स्पर्धेबरोबरच पुणे जिल्हयात जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेश मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात होणाऱ्या गणेश उत्सवात गणेश मंडळांमार्फत मतदार नोंदणी, नैतिक मतदान व मतदानाचे महत्व याविषयाबाबत विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, मा. भारत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. १ जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. 9 ऑगस्ट 2021 ते दि. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत राबविला जाणार असून प्रारुप मतदार यादी दि. 01 नोव्हेबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तरी 18 वर्ष पुर्ण झालेल्या सर्व पात्र नागरिकांनी सदर कार्यक्रमां अंतर्गत मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सातव्या दिवशीही 200+ उड्डाणे रद्द:सर्वोच्च न्यायालयाचाही याचिकेवर सुनावणीस नकार

मुंबई- देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण सोमवारी...

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...