कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची घंटा वाजवली आहे. कोरोना जगातून कधीच जाणार नाही. काही विषाणू कधीच नष्ट होत नाहीत कोरोना हा त्यापैकीच एक असू शकतो HIV सारखाच तो जगात कायमचा राहू शकतो अशी भीती डब्ल्यूएचओच्या आरोग्य आपत्कालीन विभागाचे कार्यकारी संचालक डॉक्टर मायकल रायन यांनी व्यक्त केली.जगात कोरोना महामारीत मृत्यू जाण्याचे सत्र सुरूच आहे. हा भयंकर विषाणू कसा नष्ट करायचा याबाबत वेगवेगळे उपाय शोधले जात असतानाच WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या या विधानाने जगाची चिंता वाढली आहे. डॉक्टर रायन म्हणाले की ‘मी एचआयव्ही आणि कोरोना या दोन रोगांची तुलना करत नाही. मात्र आपण वास्तविकतेचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कोरोना कधी आणि कसा गायब होईल याबाबत कोणीही भविष्यवाणी करेल ते मला वाटत नाही.’ डब्ल्यूएचओ कोविद-19चे विशेष दूत डॉक्टर डेव्हिड नॅबोरो यांनीही कोरोनावर अजून लसीचा शोध न लागणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरू शकते असे म्हटले आहे.डॉक्टर रायन यांच्या विधानानंतर एचआयव्ही रोगाची गंभीर आकडेवारी प्रकाशझोतात आली आहे. HIV ने मागील चाळीस वर्षात तब्बल तीन कोटी 20 लाख बळी घेतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बळी गेल्यानंतरही या रोगावर लस तयार करता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना बळींचा आकडा किती भीषण असेल याची चिंता संपूर्ण जगाला सतावत आहे.