कागल- लाल परी म्हणजे एस. टी.महामंडळाची बस येताच तिचे हार, नारळ व ओवाळून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकार सेवा संघ, भारतीय दलित महासंघ व स्वराज्य सेना, महाराष्ट्र यांच्या वतीने आज बाजारपेठ, कसबा सांगाव, ता.कागल , जि.कोल्हापूर या ठिकाणी हे स्वागत करण्यात आले.
तब्बल पाच महिन्यानंतर एस. टी. (लाल परी )बस या रस्त्यावरून धावली कारण गरीबांचे वाहन समजल्या जाणाऱ्या या लाल परीने रस्त्यावर सुरूवात करताच अनेक लोकांनी महामंडळाचे आभार मानले त्यामुळे या लाल परीचे स्वागत मोठ्या थाटात कसबा सांगाव येथे नारळ वाढवून करताना बाळासो कलावंत (व्यापारी) व आरती करताना सुप्रिया माने (ताई), तसेच एस. टी.चे चालक- डी.बी.खोत, वाहक -एस. एस. कांबळे (मॅडम) , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पूजारी , भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर खोत ,भारतीय दलित महासंघ कागल तालुका अध्यक्ष विश्वास माने, स्वराज्य सेना जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण,प्रकाश भोरे, दुर्गेश माने, प्रशांत कांबळे, लखन रेडेकर,संतोष कुंभार, दिपक माने, जितेंद्र बाणदार,मोहन हजारे, निसार मुल्ला, वाहक -दत्तात्रय आरेकर, दिलीप झेले,दुर्गेश तेरदाळे,मल्लू हेगडे, बाळासो हेगडे, बाबासो पिंजारी, गुलाब मुल्ला, संदिप माळी बाबासो पाटोळे आदींसह नागरीक उपस्थित होते.