सासवड मध्ये होणार आंबेडकरी विचार,साहित्याचा जागर
पुणे_डॉ.आंबेडकर विचार साहीत्य आणि दलीत तयाव्यतिरिक्तसाहित्याला नवी दिशा देणारे 3 रे डॉ.आंबेडकर साहित्य आणि विचार संमेलन 19जानेवारी रोजी सासवड नगरीत पार पडणार आहे .या संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही साहित्यिक,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त “उचल्याकार”लक्ष्मण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे .तर या संमेलनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे
सासवड येथे साला बाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सिध्दार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान हरगुडे व समविचारी संस्था संघटना यांनी एकत्रित येवुन करण्याचे योजिले आहे .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार साहीत्य संमेलनाचे आयोजन रविवार दि.19जानेवारी 2020रोजी आयोजीत केलेले आहे.या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे हे आहेत.या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मा.न्यायायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील व डॉ.शशी राय हे आहेत.या उदघाटन सत्रात काही निवडक लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे,त्यामधे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक सेवा सन्मान पुरस्कार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता सन्मानtv9चे पत्रकार योगेश बोरसे यांना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट कला सन्मान “कॉपी” सिनेमा दिग्दर्शक दयासागर वानखेडे यांना देण्यात येणार आहे व याच सत्रात पुरंदर तालुक्याचे नुतन आमदार संजय जगताप व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे असे संयोजन कमिटी चे अध्यक्ष पंकज धिवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रथम सत्रात,”फुले -शाहू -आंबेडकर यांचा महिला सक्षमीकरना विषयीचा दृष्टीकोन”अशा आशयाचा परिसंवाद ठेवण्यात आलेला आहे.त्यांमधे अध्यक्षस्थानी पुण्यनगरीच्या संपादिका ,ज्येष्ठ पत्रकार ,लेखिका राही भिडे आहेत .तर डॉ.मनिषा गुप्ते,डॉ.निशा भंडारे,डॉ.नुतन माळवी या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
दुपारच्या सत्रात शाहिर सागर गोरखे व संच यांचा प्रबोधनपर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. समारोपा मधे जेष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे हे या संमेलनाचा समारोप करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात केल्याचे संयोजकांनी सांगितले.यावेळी संयोजन राजेश चव्हाण,स्वप्निल घोडके,दादा गायकवाड,रवी वाघमारे,नितेष पवार ,स्वप्नील कांबळे आदी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी संयोजन समितीचे सदस्य आहेत.