कोल्हापूर, दि. २९ जुलै – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी करवीर तालुका येथील चिखली, आंबेवाडी गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्याच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कोल्हापूर येथील शाहूपुरी, बापट कॅम्प-कुंभारवाडा येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली आणि झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
बापट कॅम्प, कुंभारवाडा, येथे त्यांनी भेट दिली. यापरिसरा पुरामुळे मूर्तिकारांचे कारखाने पाण्याखाली गेले आहेत. मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्त्यांचे नुकसान झाले आहे. यावेळी मूर्तीकरांच्या कारखान्यातील नुकसानीची पाहणी केली. साधारणात मूर्तीकारांचे ७ हजार मूर्तींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मूर्तिकरांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना तातडीने आर्थिक मदत देणे मह्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्यांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मूर्तीकारांनी निवेदन दिले. राज्य सरकारकडून मूर्तिकरांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे यावेळी आश्वासन देण्यात आले.
कोल्हापूरचा बास्केट ब्रिजच्या बाबतीत दिरंगाई होते आहे. हे काम लवकर झाल्यास दळणवळणाचा प्रश्न राहणार नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील, राजे समरजित सिंह घाटगे, राहुल चिकोळे, माजी आमदार अमल महाडिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.