मुंबई दि. 6 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आज पहाटे नवी दिल्ली विमानतळावरून रवाना झाले असून आज सकाळी अमेरिकेच्या जॉन केनेडी विमानतळ न्यूयॉर्क येथे पोहोचले आहेत. अमेरिका दौऱ्यात ना.रामदास आठवले हे न्यूयॉर्क ;न्यूजर्सी आणि ह्युस्टन या शहरांना भेट देणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले अमेरिका दौऱ्यात अमेरीकेतील भारतीय दूतावास येथे भेट देणार आहेत. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत.तसेच अमेरीकेतील भारतीय नागरिकांशी भारतीय दुतावस येथे संवाद साधणार आहेत.
न्यूयॉर्क येथे इंडो अमेरिकन असोसिएशन फॉर सोशल डेव्हलपमेंट च्या परिषदेत ना.रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका दौऱ्या दरम्यान अमेरिकीतील विविध शहरांत वास्तव्यास असणाऱ्या भरतीयांशी ते संवाद साधणार आहेत. येत्या दि.12 नोव्हेंबर रोजी अमेरिका दौरा पूर्ण करून ना.रामदास आठवले भारतात परतणार आहेत.