पुणे-तिस-या पर्वामध्ये ‘मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०२०’ – सीझन ३ चा भव्य फिनाले यंदा २८ नोव्हेंबर २०२० रोजी अलिला दिवा गोवा, लॅण्ड ऑफ सॅण्ड*सी*सन येथे आयोजित करण्यात आले. या फिनालेने सर्व ४७ फायनालिस्ट्सच्या जीवनामध्ये ‘सामान्यतेपासून विलक्षणते’पर्यंत आमूलाग्र बदल घडवून आणला. महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यांचे प्रतिनिधित्व केलेल्या या महिलांनी शौर्य व धैर्य दाखवले. या व्यासपीठाने सामान्य महिलांना ख-या भावनेसह महिला सक्षमीकरण या मोठ्या मंचावर आणले.
दि रोसरी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विनय अरन्हा यांनी जहांगीर ओराकेअर डेण्टल सेंटरसोबत सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमाला सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री माननीय मंत्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते. दिवा पेजीण्ट्समने या भव्य कार्यक्रमाची संकल्पना मांडली.
सर्व ४७ फायनालिस्ट्सना चार दिवस दिवा पेजीण्ट्सचे कार्ल अॅण्ड अंजना मस्करेन्हास यांच्या तज्ञ मार्गदर्शनांतर्गत प्रस्तावना, आवाजातील बदल, मंचावरील सादरीकरण, प्रश्नोत्तरे अशा पेजीण्टच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महक चहल (अभिनेत्री), ब्रूना अब्दुल्ला (अभिनेत्री), सुहानी मेंडोन्सा (इव्हेण्ट्स), ग्वेन डी (डिझाइनर), विवेक मेंडोन्सा (लॉरेन्स अॅण्ड मायो) हे प्रख्यात परीक्षक लाभले.
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता अमन यतन वर्माने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याने आत्मविश्वासासह या भव्य कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन केले.
फायनालिस्ट्सनी किताब जिंकण्यासाठी त्यांचे अद्वितीय ग्रुमिंग कौशल्य दाखवले आणि आत्मविश्वास व भव्यतेसह स्वत:ला सादर केले. प्रख्यात परीक्षकांना सिल्व्हर (वयोगट २० ते ३६ वर्षे) आणि गोल्ड (वयोगट ३७ वर्षे व त्यापेक्षा अधिक) या दोन विभागांमधील ४७ सेमी-फायनालिस्ट्समधून ८ सर्वोत्तम फायनालिस्ट्सची निवड करणे अत्यंत अवघड गेले.
किताबाचे विजेते:
विजेती – सिल्व्हर: विभुती पांडे
विजेती – गोल्ड: चैताली वैद्य
पहिली उपविजेती – सिल्व्हर: अंशिका अरोरा
पहिली उपविजेती – गोल्ड: बंदाना दुआ
दुसरी उपविजेती – सिल्व्हर: श्वेता ओस्वाल जैन
दुसरी उपविजेती – गोल्ड: सुनिता कुलकर्णी
तिसरी उपविजेती – सिल्व्हर: यशोदा पवार
तिसरी उपविजेती – गोल्ड: जयश्री बावनकर
किताबासह सन्मानित करण्यात आलेल्या चार आंतरराष्ट्रीय क्वीन्स:
अश्विनी कु-हाडे, वर्षा भावसार, सुजाता यांडे, प्रतिमा जाधव
प्रचिती पुंदेचा मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रलएशिया २०२१ म्हणून करण्यात आलेला सन्मान या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. ती दिवा पेजीण्ट्स अंतर्गत प्रतिष्ठित ”मिसेस युनिव्हर्स २०२१’साठी भारताचे प्रतिनिधीत्व करेल.
निपुण नृत्यदिग्दर्शक पूजा सिंग हिने तिच्या अद्भुत सीक्वेनेस व शो डिरेक्शनसह सर्वांची मने जिंकली. सिन्थिया फुर्टाडोने ‘मिसेस वेस्ट इंडिया’चे गीत संगीतबद्ध करण्यासोबत गायले. या कार्यक्रमाला फराह अन्वर, श्रद्धा रामदास, नेहा चौहान व मृणाली तायडे यांचा सहयोग मिळाला.
विजेत्यांना आकर्षक मुकुट, रोख बक्षीसे आणि मोदसुत्र, लॉरेन्स अॅण्ड मायो, दीशा चॉकलेट्स, प्लस बीव्हरेजेस, ऑरा अराऊंड, बी-दिवा व ऑरिक यांच्याकडून गिफ्ट्स देण्यात आले.
कार्ल अॅण्ड अंजना मस्करेन्हासचा अभिनव उपक्रम मिसेस वेस्ट इंडिया एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडियाने दिवा कॅचलाइन: ”डेअर * ड्रीम * डॅजल” उत्तमरित्या सादर केली आहे.