मुंबई: ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांनी अभिनेत्री कंगना हिला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती.मात्र वाय सुरक्षा घेत कंगना मुंबईत दाखल झाली आणि घरी देखील पोहोचली . घरी पोहचल्यावरही तिने आपले ट्विटर वॉर सुरूच ठेवले .आणि व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.यावेळी एकेरी उल्लेख करून तिने दिवसभर मिळविलेली सहानुभूती गमावली .कंगना मुंबईत नसताना मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसमधील काही बेकायदा बांधकामाचा भाग २४ तासाची नोटीस देऊन कोर्टात असलेली याचिका झुगारून पाडायला सुरुवात केल्याने कंगनाला लोकांची सहानुभूती मिळू लागली होती . प्रवासात तिने केलेल्या ट्विटरवॉर ने ती पॉवर फुल बनू लागली असताना घरी आल्यावर हि तिने एक व्हिडिओ शेअर केला . तो करताना कंगनाने मोठी चूक केली ती म्हणजे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला .’उद्धव ठाकरे आज मेरा घर टूता है, कल तेरा घमंड टूटेगा… असे म्हणत तिने मिळविलेली सहानुभूती पुन्हा गमावली असे बोलले जाऊ लागले .
नेमकी ती काय म्हणाली ते पहा ..