5 भाजपशासितांसह 11 राज्यांचा लसीकरणासाठी नकार
नवी दिल्ली-केंद्र सरकारने लसीचा तुटवडा लक्षात घेता रशियन लस ‘स्पुतनिक व्ही’ला मंजुरी दिली होती. याच पार्श्वभूमीवर ‘स्पुतनिक व्ही’ या लसीची पहिली खेप शनिवारी भारतात दाखल असून त्याला हैदराबाद येथील विमानतळावर लँड करण्यात आले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेची गती वाढणार आहे. देशातील अनेक राज्यांनी 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरणाच करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, लसीचा पुरवठा लक्षात घेता तो पुढे ढकलण्यात आला. विशेष म्हणजे ही लस भारतात आल्यानंतरही राज्यातील लसीचा पुरवठा लक्षात घेत भाजप शासित 5 राज्यांसह 11 इतर राज्यांनी यासाठी नकार दिला आहे.
भारत देशात लस उत्पादकतेचे काम रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड ही कंपनी पाहते. दरम्यान, या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी सांगितले होते की, सध्या भारतात दरमहा 50 कोटी डोस तयार केले जातील. ते पुढे बोलताना म्हणाले की, एका वर्षात 85 कोटी डोस तयार करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून मुख लस उत्पादकांशी तसा करारदेखील केला आहे
केंद्राने सांगितले की, राज्यांजवळ आजघडीला 1 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहे. दरम्यान, काही दिवसांत 20 लाख डोस अजून देण्यात येणार असल्याचेदेखील केंद्राने म्हटले. केंद्राने पुढे म्हटले की, 45 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणासाठी डोस पुढे सुरुच राहणार असल्याचे सांगितले.