पुणे, 17 फेब्रुवारी 2021: गुलमर्ग, जम्मू-काश्मीर येथे स्की अँड स्नोबोर्ड संघटना(महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित पहिल्या स्की अँड स्नोबोर्ड राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या ताहीर शबीर, इद्रिस हुसामुद्दीन, सकीना यामिनी आणि सकीना कसींजी या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावले.
7 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडलेल्या या कुमार गटाच्या स्पर्धेत 10 जिल्ह्यांतून 60 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम 400 मीटर अंतरावरील होती. यामध्ये 14वर्षाखालील मुलांच्या गटात मुंबईच्या इद्रिस हुसामुद्दीन याने प्रथम क्रमांक पटकावला. तर, मुंबईच्या हुस्सेन सिराजने दुसरा व पुण्याच्या शार्दूल कुऱ्हे व अमेय दांगट यांनी तिसरा क्रमांक पटकावला. याच मुलींच्या गटात मुंबईच्या सकीना यामिनी हिने पहिला व पुण्याच्या काम्या कार्तिकन हिने दुसरा क्रमांक पटकावला.
16वर्षाखालील मुलांच्या गटात मुंबईच्या ताहीर शबीर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींच्या गटात सकीना कसींजीने अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्की अँड स्नोबोर्ड संघटनेचे अध्यक्ष आनंद लाहोटी, सचिव साबीर शेख, खजिनदार प्रदीप राठोड, डॉ. ए.दयानंद कुमार, डॉ.प्रदीप खांडरे आणि कालिदास मगर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14वर्षाखालील मुले: (सुवर्ण, रजत व कांस्य पदक या क्रमानुसार)1. इद्रिस हुसामुद्दीन(मुंबई), 2.हुस्सेन सिराज(मुंबई), 3.शार्दूल कुऱ्हे व अमेय दांगट(पुणे);14वर्षाखालील मुली:1.सकीना यामिनी(मुंबई), 2.काम्या कार्तिकन(पुणे), 3.इन्सिया वझिरी/फरीदा हमदानी(मुंबई)
16वर्षाखालील मुले:1.ताहीर शबीर(मुंबई), 2.मोहम्मद जमालुद्दीन(मुंबई), 3.कृष्णा परदेशी/आर्यन कुऱ्हे(पुणे)16वर्षाखालील मुली: 1.सकीना कसींजी(मुंबई), 2.फातिमा कोराकीवाला(मुंबई), 3.रिद्धी राठी/आस्था लाहोटी(पुणे) .