मुंबई. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुशांत काही दिवसांपासून नैराश्यावर उपचार करत होता असे काही रिपोर्ट्समध्ये समोर आलेसुशांत आत्महत्या केली त्यावेळी त्याचे मित्र देखील घरात होते. सकाळी मित्रांनी आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला सुशांतचा मृतदेह आढळला. सुशांतच्या घरात काही कागदपत्रे देखील सापडली आहेत, ज्याद्वारे समजते की, तो नैराश्यावर उपचार करीत होता. काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, सुशांतचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध होते आणि सध्या या अफेयरमध्ये धुसफूस होती. सुशांत यामुळेही परेशान होता.