पुणे, 3 जानेवारी 2022: टेनिस एसेस यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत सूर्यप्रताप निंबाळकर, राहुल कोठारी, अमित शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एसेस स्पोर्ट्स अरेना टेनिस कोर्ट उंड्री येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत सूर्यप्रताप निंबाळकरने आपली विजयी मालिका कायम ठेवत नितीन सावंतचा 6-1 असा तर, विवेक खडगेने रतिश रितुसारियाचा 6-2 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अमित शर्मा याने रवी कोठारीचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम ठेवले. राहुल कोठारीने अंकित कापसेला 6-2 असे पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्य फेरीत सुनील लुल्लाने आदित्य व्यासच्या साथीत अभिषेक चव्हाण व संजय सेठी या जोडीचा 6-3 असा तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत रवी कोठारी व राहुल कोठारी यांनी अमित शर्मा व रतीश रितुसरिया यांचा 6-3 अशा सारख्याच फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
सूर्यप्रताप निंबाळकर वि.वि.नितीन सावंत 6-1
विवेक खडगे वि.वि.रतिश रितुसारिया 6-2
अमित शर्मा वि.वि.रवी कोठारी 6-4;
राहुल कोठारी वि.वि.अंकित कापसे 6-2;
दुहेरी: उपांत्य फेरी:
सुनील लुल्ला/आदित्य व्यास वि.वि.अभिषेक चव्हाण/संजय सेठी 6-3;
रवी कोठारी/राहुल कोठारी वि.वि.अमित शर्मा/रतीश रितुसरिया 6-3.