पुणे: नवसह्याद्री क्रीडा संकुल व एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रितिका मोरे व श्रीया देशपांडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
एरंडवणा येथील नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रितिका मोरे हिने सहाव्या मानांकित प्रिशा शिंदेचा 6-1, 7-5 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. वैष्णवी सिंग हिने नाव्या भामिदीप्तीवर 6-2, 6-2 असा विजय मिळवला. श्रीया देशपांडे हिने तिसऱ्या मानांकित अलिना शेखचा 6-2, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
मुलांच्या गटात आर्यन घाटगे याने अर्जुन कीर्तनेचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(8), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत अवनीश चाफळे याने अथर्व राऊतचा 4-6, 6-3, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 14 वर्षाखालील मुले:
पार्थ देवरुखकर(1) वि.वि.ओंकार शिंदे 6-3, 6-2;
अभिराम निलाखे(5) वि.वि.देव तुराकिया 6-3, 6-2;
आर्यन घाटगे वि.वि.अर्जुन कीर्तने 3-6, 7-6(8), 6-0;
अवनीश चाफळे वि.वि.अथर्व राऊत 4-6, 6-3, 6-0;
अद्विक नाटेकर(2) वि.वि.अभय नागराजन 6-4, 6-4;
14 वर्षाखालील मुली:
जुई काळे(1) वि.वि.अग्निमित्रा भट्टाचार्या 6-1, 6-1;
वैष्णवी सिंग वि.वि.नाव्या भामिदीप्ती 6-2, 6-2;
रितिका मोरे वि.वि.प्रिशा शिंदे(6) 6-1, 7-5;
श्रीया देशपांडे वि.वि.अलिना शेख(3)6-2, 6-1