- एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भमिदिप्तीचे आव्हान संपुष्टात
पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 19व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. तर, श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे एकेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्ठात आले आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथ्या मानांकित नॉर्वेच्या उलरिके एकेरीचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 1तास 4मिनिटे चाललेल्या या लढतीत एकेरीने सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये इमाची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात अशी आघाडी घेतली. पण आघाडीवर असलेल्या एकेरीला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. इमाने जोरदार कमबॅक करत एकेरीची चौथ्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस होल्ड करत हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळवली. पिछाडीवर असलेल्या एकेरीला दुसऱ्या सेटमध्येदेखील सूर गवसला नाही. इमाने या सेटमध्येदेखील आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत एकेरीची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस भेदली. इमाच्या बिनतोड सर्व्हिसेसच्या पुढे एकेरीची खेळी निष्प्रभ ठरली. इमाने तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये एकेरीची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-0 असा जिंकून सनसनाटी निकाल नोंदविला. थायलंडच्या क्वालिफायर पुनिन कोवा पिटुक्टेड हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्तीचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्ठात आणले. हा सामना 1तास 26मिनिटे चालला.
रशियाच्या ओल्गा दोरोशिना हिने लतवीयाच्या सहाव्या मानांकित डायना मर्सिंकेविकाचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(5), 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या सातो नाहोने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या थायलंडच्या नुदनिदा लुआंगनामचा टायब्रेकमध्ये 6-3, (4)6-7, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसिया स्मिथ हिने इटलीच्या कोरिना डेंटोनीला 6-3, 7-6(3) असे पराभूत करून आगेकूच केली. थायलंडच्या आठव्या मानांकित पेंगतार्न प्लिपुच हिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवता इटलीच्या मार्टिना केरगारोला 7-6(4), 6-2 असे नमविले.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जिया-की कांग व थायलंडच्या पेंगतारण प्लिपूच यांनी स्टेफी कार्थर्स व भारताच्या रम्या नटराजन या जोडीचा 6-0, 7-6(3) असा तर, रशियाच्या दारिया मिशीना व ऍना मोरगिना या जोडीने जपानच्या क्योका ओकामुरा व सातो नाहो यांचा 6-1, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ:दुसरी फेरी: एकेरी गट:
सातो नाहो(जपान)वि.वि.नुदनिदा लुआंगनाम(थायलंड)6-3, (4)6-7, 6-0;
ऍलिसिया स्मिथ(ऑस्ट्रेलिया)वि.वि. कोरिना डेंटोनी(इटली)6-3, 7-6(3);
पेंगतार्न प्लिपुच(थायलंड)(8)वि.वि. मार्टिना केरगारो(इटली)7-6(4), 6-2;
शालिमार तालबी(बेलारूस)वि.वि.रिसा उशिजिमा(जपान) 7-6(3), 7-5;
पुनिन कोवा पिटुक्टेड(थायलंड)वि.वि.श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती(भारत)6-3, 6-4;
इमा राडकानू(ग्रेट ब्रिटन)वि.वि.उलरिके एकेरी(नॉर्वे)(4)6-3, 6-0;
ओल्गा दोरोशिना(रशिया)वि.वि.डायना मर्सिंकेविका(लतवीया)(6)4-6, 7-6(5), 6-2;
नैकता बेन्स(ग्रेट ब्रिटन)(5)पुढे चाल वि. कॅटी बौलटर(ग्रेट ब्रिटन);
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: