दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे पूना क्लबपुढे 256 धावांचे आव्हान;
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी यज्ञेश मोरे 91(155,16×4), अद्वैत मुळ्ये 33 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघापुढे 256 धावांचे आव्हान उभे केले आहे.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 67षटकात 7बाद 256धावा करून संघाचा डाव घोषित केला. यात यज्ञेश मोरेने 155 चेंडूत सयंमपूर्ण फलंदाजी करताना 16 चौकारांसह 91धावा, अद्वैत मुळ्येने 99चेंडूत 33 धावा करून चांगली सुरुवात करून दिली. यज्ञेश मोरे व अद्वैत मुळ्ये यांनी दुसऱ्या गडयासाठी 193चेंडूत 86धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर सुरज गोंड 23, टिळक जाधव 22, यश जगदाळे 21, विकी ओस्तवाल नाबाद 20यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. पूना क्लबकडून दर्शित लुंकड 49 धावात 5 गडी बाद करून सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पूना क्लब संघाने आजदिवसअखेर 21षटकात 3बाद 57धावा केल्या.यात वरद कुलकर्णी नाबाद 28धावा, निश्चय नवले नाबाद 6 धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व पूना क्लब यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 67षटकात 7बाद 256धावा(डाव घोषित)(यज्ञेश मोरे 91(155,16×4), अद्वैत मुळ्ये 33(99), सुरज गोंड 23(22), टिळक जाधव 22(33), यश जगदाळे 21(35), विकी ओस्तवाल नाबाद 20, दर्शित लुंकड 13-49-5, मुकुंद गायकवाड 12-67-2) वि.पूना क्लब: 21षटकात 3बाद 57धावा(कमल पुनिया 18(15), वरद कुलकर्णी नाबाद 28(56), निश्चय नवले नाबाद 6, टिळक जाधव 6-22-2, विकी ओस्तवाल 8-5-1);