उपाध्यक्ष- सिध्दार्थ पारीख(पी.जे.हिंदू जिमखाना), सौमिल कारकेरा(गरवारे क्लब हाऊस) बिनविरोध निवड
सह मानद सचिव- मानव पांचाल(मालाबार हिल क्लब), ऋषभ कुमार(बॉंबे जिमखाना) बिनविरोध निवड
खजिनदार- शेखर सुर्वे(डब्ल्यु आर एस ए)- बिनविरोध निवड
कार्यकारीणी समिती सदस्य- विशाल मदन(चेंबुर जिमखाना), प्रणव चिखले(पी.जे हिंदू जिमखाना), व्येंकटेश्वरा सुब्रमनिअन(माटुंगा जिमखाना), अमित सप्रु(पार्क क्लब), अंगद भाट्टी(आदर्स क्लब), आदित्य देशपांडे(पीवायसी हिंदू जिमखाना)
बिलियर्डस् अँड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी राजन खिंवसरा यांची निवड
मुंबई: पुना क्लबचे राजन खिंवसरा यांची बिलियर्डस् अँड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत पी.जे.हिंदू जिमखाना येथे पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरम्यान झालेल्या निवडणूकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुळ पुण्यातील खिंवसरा यांना हा मान दुसर्यांदा मिळाला आहे. याआधी त्यांनी 2015-16 या वर्षी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच, गेल्या सात वर्षांपासून त्यांनी भारतीय बिलियर्डस् अँड स्नुकर संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
अध्यक्ष खिंवसरा यांच्यासह अन्य सर्व पदाधिकार्यांची निवडही बिनविरोध करण्यात आली. सिध्दार्थ पारिख(पीजे हिंदू जिमखाना), सौमील करकेरा(गरवारे क्लब हाऊस)यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच, मानव पांचाळ(मलबार हिल क्लब), ऋषभ कुमार(बॉम्बे जिमखाना)यांची मानद सहसचिवपदी निवड करण्यात आली. शेखर सुर्वे(वेस्टर्न रेल्वे)यांचीही मानद खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारी समितीच्या सदस्यांसाठी सहा पदांकरिता 9 उमेदवार असल्याने मतदान घेण्यात आले. यातील निवड झालेले सहा सदस्य पुढीलप्रमाणेः-विशाल मदन(चेंबुर जिमखाना), प्रणव चिखल(पीजे हिंदू जिमखाना), वेंकटेश्वरण सुब‘मण्यम(माटुंगा जिमखाना), अमित सप्रु(पार्क क्लब), अंगद भट्टी(पोटर्स् क्लब) आणि आदित्य देशपांडे(पीवायसी हिंदू जिमखाना). आदित्य देशपांडे यांनी 2009 मध्ये कुमार आशियायी स्पर्धेत तेरावे स्थान पटकावले होते, तसेच त्याच पुण्यात विविध स्पर्धा आयोजनात करण्यात मोलाचा वाटा आहे.
यावेळी बोलताना नुतन अध्यक्ष खिंवसरा म्हणाले की, मी आणि माझे नवीन सहकारी यांचा मुंबईत क्यु स्पोर्टस् अकादमीत आणि प्रशिक्षण कार्यक‘म सुरू करण्याचा प्रयत्न आहे. किंबहुन ही आमच्या अजेंडावरील पहिली महत्वाची कार्यक्रम पत्रिका असणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दोन वेळचा माजी आशियाई स्नुकर विजेता यासिन मर्चंट याने अगोदरच काम सुरू केले असून या युवा खेळाडूंना याचा प्रामुख्याने फायदा होणार आहे. वरिष्ठ खेळाडू हळूहळू निवृत्त होत असल्याने त्यांची जागा युवा खेळाडू घेत असल्याने ही एक सातत्याने चालणारी प्रकि‘या ठरते. परंतु गुणवान युवा खेळाडू पुढे येणे आवश्यक असल्याने या प्रशिक्षण कार्यक्रमाची खर्या अर्थाने आवश्यकता आहे.
आम्ही या योजनेसाठी राज्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याशी याआधीच संपर्क साधला असून मुंबई येथे क्यु स्पोर्टस् अकादमी सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच, राज्य सरकारने अकादमीसाठी भूखंड देण्याचेही तोंडी आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सहकार्याने लवकरात लवकर ही अकादमी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईतील अकादमीचे काम व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पुण्यात दुसरी अकादमी सुरू करण्याचे आमचे लक्ष आहे आणि त्यासाठी आर्थिक निधीच्या स्वरूपात किंवा अन्यप्रकारे साहाय्य देण्यास आमचा प्रयत्न राहिल. परंतु मुंबईत अकादमी सुरू करणे हेच आमचे पहिले ध्येय आहे.
जुन्या कार्यकारी समितीतील अनेक सदस्य नव्या कार्यकारिणीत असल्याबद्दल खिंवसरा यांनी विशेष आनंद व्यक्त केला. याआधीच्या कार्यकारिणीने खुप चांगले काम केले असून त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कोणतेही विशेष आर्थिक साहाय्य मिळत नसतानाही त्यांनी आपल्या कालखंडात 20पेक्षा अधिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आम्ही त्यांची ही चांगली कामगिरी पुढे कायम सुरु ठेवण्याचा 100टक्के प्रयत्न करू.
बीएसएएमची कार्यकारिणी सदस्य समिती पुढीलप्रमाणे(2019-2021)
अध्यक्ष- राजन खिंवसरा(पुना क्लब) बिनविरोध निवड