पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत मानस धामनेने आपला राज्यबंधु अर्जून अभ्यंकर याचा 6-2, 6-1 असा पराभव करत आगेकुच केली. कर्नाटकच्या सहाव्या मानांकीत अदिथ अमरनाथ याने कर्नाटकच्याच वेद मुदकावी याचा 6-3, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. तिस-या मानांकीत तमिळनाडूच्या प्रणव रेथिन याने दिल्लीच्या पराग जैनचा 6-4, 5-7, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. आसामच्या सातव्या मानांकीत जिग्याशमान हजारीकाने गुजरातच्या अथर्व पटेलचा 6-3, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या जोशुवा जॉन इपेन याचा मानांकीत खेळाडूला धक्का
पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत जोशुवा जॉन इपेन याने दिल्लीच्या पाचव्या मानांकीत ओमांश सहारीया याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत आश्चर्यकारक निकालाची नोंद केली.
महाराष्ट्राच्या आर्यन हुडने तेलंगणाच्या प्रणित भाटीयाचा 6-4, 6-0 असा,
निल जोगळेकरने तेलंगणाच्या वेंकट कुमार रेड्डी याच 6-0, 6-1 असा तर
ईशान देगमवारने महाराष्ट्राच्याच तनि ष्क जाधवचा 6-0, 6-1 व
अयान गिरधर याने मध्य प्रदाशच्या मनवर्धन राखेचा याचा 6-2, 7-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- 14 वर्षाखालील मुले
जोशुवा जॉन इपेन(महाराष्ट्र) वि.वि ओमांश सहारीया(5)(दिल्ली) 6-3, 6-2
मानस धामने (1)(महाराष्ट्र) वि.वि अर्जून अभ्यंकर (महाराष्ट्र) 6-2, 6-1
अदिथ अमरनाथ(6) (कर्नाटक) वि.वि वेद मुदकावी(कर्नाटक) 6-3, 6-0
प्रणव रेथिन(3)(तमिळनाडू) वि.वि पराग जैन(दिल्ली) 6-4, 5-7, 6-2
जिग्याशमान हजारीका(7)(आसाम) वि.वि अथर्व पटेल(गुजरात) 6-3, 6-1
राधेय शहाणे(महाराष्ट्र) वि.वि हरीशरण भास्करन(तमिळनाडू)6-1, 6-2
अहान धेकील(उत्तर प्रदेश) वि.वि प्रथमेश पाटील(महाराष्ट्र) 6-4, 6-3
विनित मुत्याल(तेलंगणा) वि.वि द्रिक शहा(महाराष्ट्र) 6-1, 6-1
प्रज्वल तिवारी(महाराष्ट्र) वि.वि धिरज रेड्डी(तेलंगणा) 6-0, 6-0
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र) वि.वि सुचिर शेशाद्री(कर्नाटक) 6-0, 6-2
केशव गोयल(पश्चिम बंगाल) वि.वि आदित्य तलाटी(महाराष्ट्र) 6-3, 6-3
आर्यन हुड(महाराष्ट्र) वि.वि प्रणित भाटीया(तेलंगणा) 6-4, 6-0
निल जोगळेकर(महाराष्ट्र) वि.वि वेंकट कुमार रेड्डी(तेलंगणा) 6-0, 6-1
ईशान देगमवार(महाराष्ट्र) वि.वि तनिष्क जाधव (महाराष्ट्र) 6-0, 6-1
अयान गिरधर (महाराष्ट्र) वि.वि मनवर्धन राखेचा(मध्य प्रदाश) 6-2, 7-5