मुंबई- तुरुंगात असणाऱ्या आर्यन खानला भेटण्यासाठी त्याचे वडील आणि अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. पिता आणि पुत्राची जवळपास 18 मिनिटे भेट झाली.
शाहरुखसोबत त्याच्या स्टाफमधील काही लोकही होते . मात्र, फक्त शाहरुख खानने आर्यन खानची भेट घेतली. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आपल्या वडिलांना पाहून खूप रडला. 2 ऑक्टोबर रोजी अटक झाल्यानंतर प्रथमच आर्यनच्या कुटुंबातील एक सदस्य त्याला भेटायला आला आहे.NDPS कोर्टात आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. या एका आठवड्यातच ते आर्यनला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. खरेतर 1 नोव्हेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. यानंतर, न्यायालय 14 नोव्हेंबरनंतरच उघडेल. अशा परिस्थितीत, आर्यनच्या बेलसाठी फक्त 7 वर्किंग डेस म्हणजेच एका आठवड्याचाच कालावधी आहे.