मुंबई / पुणे – सांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे;पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..! या मायमराठी ने काल प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने खुलासा करून , कलावंत मानधनापासून वंचित आहेत मात्र त्यास कार्य संचालनालयाची निष्क्रियता असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.याबाबत या विभागाने असे म्हटले आहे कि ,वृद्ध साहित्यिक ,कलावंत यांना मानधनासाठी २०१९-20 साठी ४९ कोटी ८१ लाख ३० हजार रुपये निधीची मागणी नोव्हेंबर २०१८ मध्येच सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली होती मात्र २ कोटी 20 लाख रुपये एवढाच निधी मंजूर झाला . ३४ जिल्ह्याचे मानधन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाद्वारे अदा करण्यात येत होते .मात्र सप्टेंबर २०१६ पासून संचालनालयाच्या मार्फत थेट कलावंतांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मार्च २०१९ च्या अंदाजपत्रकात संचालनालयाने मागणी केलेला निधी मंजूर न झाल्याचे निदर्शनास येताच १८ मार्च ,20 मार्च आणि 6 मे रोजी शासनास कळविण्यात आले. आकस्मिक निधीची मागणी करण्यात आली .मात्र कोणताही निधी आजतागायत प्राप्त न झाल्याने कलावंताना फेब्रुवारी २०१९ पासून मानधनापासून वंचित राहावे लागले आहे .मात्र त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रीयते मुळे कलावंत मानधनापासून वंचित राहिले हि बाब चुकीची आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.