इलेक्ट्रिशियनच्या मुलांच्या भविष्यासाठी योगदान देणे हा केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश
पुणे-, २९ जून २०२२: आरआर ग्लोबल या १.२५ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेल्या समूहाचा एक भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीची वायर आणि केबल उत्पादक कंपनी आरआर केबलने भारतातील इलेक्ट्रिशियनच्या मुलांना मदत करण्यासाठी केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केला. हा उपक्रम आरआर ग्लोबलच्या मिशन रोशनीच्या सक्षम आणि शिक्षित भारत साध्य करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. या उपक्रमाद्वारे आरआर केबल इलेक्ट्रिशियनच्या मुलांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी १ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे.
ज्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांनी या वर्षी त्यांची १० वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. पहिल्या १,००० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि त्यांना प्रत्येकी १०,००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. या निवडीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे सोपी आहेत आणि त्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
· विद्यार्थ्यानी त्यांच्या पहिल्या प्रयत्नात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत किमान ६०% गुण संपादन केलेले असावेत
· अर्जदाराचे वडील/आई यांनी देखील स्वतःची इलेक्ट्रिशियन म्हणून आरआर केबल कडे नोंदणी करावी.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल बोलताना आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काबरा म्हणाल्या, “केबल स्टार्स उपक्रमाद्वारे आमचा उद्देश इलेक्ट्रिशियनच्या मुलांना उच्च ध्येय ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचे सक्षम भविष्य निर्माण करणे हा आहे. एक कंपनी म्हणून आमचा असा ठाम विश्वास आहे की आमची व्यवसाय वाढ ही आमच्या समाजाच्या आणि आमच्या भागधारकांच्या यशाशी नेहमी थेट प्रमाणात असेल. इलेक्ट्रिशियन समुदाय आमच्या कंपनीच्या केंद्रस्थानी आहे आणि या शिष्यवृत्तीसह, आम्ही त्यांच्या कुटुंबांना आणि मुलांना एक उज्वल भविष्यकाळ प्रदान करण्याची आशा करतो. प्रत्येक केबल स्टारने त्यांच्या आवडीची स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवून उच्च शिक्षण घेऊन त्यांच्यातील कुतूहलता वाढवावी अशी आमची इच्छा आहे. मेड इन इंडिया कंपनी म्हणून आरआर केबल आपल्या देशाच्या विकासासाठी समर्पित आहे आणि अशा उपक्रमांद्वारे आम्ही आजच्या मुलांना उद्याचे नेते बनण्यासाठी सक्षम करू अशी आशा करतो.”
कंपनी व्यवसायाच्या पलीकडे योगदान देण्यावर आणि जे पात्र आहेत त्यांचे जीवन उज्ज्वल करण्यावर विश्वास ठेवते. या विचारातून आरआर केबलच्या स्टार केबल शिष्यवृत्ती कार्यक्रमाची कल्पना उदयास आली. हे विद्यार्थी त्यांच्या भविष्याकडे पहिले पाऊल टाकण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणि आरआर केबलला या मुलांच्या या अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रवासाचा एक भाग बनायचे आहे.
आरआर ग्लोबल ने जानेवारी २०२० मध्ये समूहाच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून मिशन आररोशनी सुरू केले. कंपनीचे प्रयत्न शिक्षण, सक्षमीकरण, कौशल्य विकास, आरोग्य आणि शाश्वत उपायांसाठी समर्पित आहेत. आरआर ग्लोबलचे उद्दिष्ट विकास आणि वैयक्तिक वाढीस समर्थन देऊन लोकांच्या जीवनात चिरस्थायी सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, प्रतिभेचे संगोपन करणे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांना सामर्थ्यवान करणे आणि महिलांना भविष्यातील नेते होण्यासाठी सक्षम करणे हे आहे.