मुंबई-
एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ असं ठेवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून हे नाव वापरण्यास विरोध होणार असल्याचे दिसून येते आहे. मात्र, या नावाची लवकरच एकनाथ शिंदे गटाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.“शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं गटाचं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. एकत्र निवडणुका लढवूनही आपण भाजपापासून दूर झालो, तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? असा सवाल शिंदे गटाकडून केला जातो आहे.