तामिळनाडू झाले राहुलमय….
कन्याकुमारी -खासदार राहुल गांधी तमिळनाडु दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. राज्यातील मुलागुमूदुमधील सेंट जोसेफ मॅट्रिकुलेशन हाययर सेकेंडरी स्कूलमध्ये राहुल गांधींनी आधी विद्यार्थ्यांसोबत डान्स केला, नंतर विद्यार्थ्यांना अकिडोची ट्रेनिंग दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पुश-अपदेखील काढले.यापूर्वी राहुल गांधींनी कन्याकुमारीमध्ये रोड शो केला. यादरम्यान, त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मनात तामिळ लोकांबद्दल सन्मान नाही. आम्ही मोदी आणि RSS ला तामिळ संस्कृतीचा अपमान करू देणार नाहीत. राहुल पुढे म्हणाले की, मोदी म्हणतात वन नेशन, वन कल्चर, वन हिस्ट्री. तामिळ भारतीय भाषा नाही ? तमिळनाडूचा इतिहास आणि संस्कृती भारतीय नाही? एक भारतीय नागरिक असल्यामुळे तामिळ संस्कृतीला वाचवणे माझे कर्तव्य आहे.’