पुणे-धनकवडी येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक अर्थात ३ हत्ती चौका नजीक च्या महापालिकेच्या क्रीडासंकुला ला लागून सुमारे २० फुट उंचीवर पद्मावती नगर ला नेणाऱ्या नियोजित रस्त्याचे समर्थन भाजपचे नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांनी केले असून तो रस्ता अपघाती स्थळ बनणार नाही याची सर्वस्वी काळजी घेवून करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे आणि हि जबाबदारी प्रशासन पार पाडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. धनकवडी येथील कार्यकर्ते अप्पा परांडे , शिवसेनेचे अनिल बटाने यांनी हा रस्ता अपघाती स्थळ बनेल अशी भीती व्यक्त करून त्यास विरोध केला आहे. धनकवडी आणि गुलाब नगर आदी परिसरातील येथून ये जा करणाऱ्या वाहनांना अपघात होईल अशा पद्धतीने रस्ता होत असल्याची शंका उपस्थित झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरु झाली . त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक सुभाष जगताप यांनी हा रस्ता नियमबाह्य असल्याचा आरोप केला होता . या पार्श्वभूमीवर शिळीमकर यांनी देखील आपले याबाबतचे मत ‘माय मराठी ‘ कडे व्यक्त केले आहे. पद्मावती नगर ला ये जा करण्यासाठी अस्तित्वात असलेला रस्ता अपुरा आणि आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण करू शकणारा असल्याने पद्मावती नगर ला आणखी एक रस्ता देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे .. नेमके शिळीमकर यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका ….