थोडक्यात समजून घ्या पत्रा चाळ प्रकरण
- गोरेगावमधील पत्रा चाळीच्या पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत करार केला होता.
- 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. मात्र, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतेही बांधकाम न करता भूखंड 1 हजार 34 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकला.
- प्रवीण राऊत यांच्यासह पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान फर्मचे संचालक होते. ईडीने याप्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
- प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. ईडीने याआधी राऊत यांच्या एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रु. मालमत्तेवर टाच आणली आहे.
ईडीच्या कचाट्यात अडकलेले आघाडीचे नेते
- माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 3 नोव्हेंबर 2021 रोजी अटक
- माजी अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक
- राष्ट्रवादीचे माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्याची चौकशी, 28 फेब्रुवारीला त्यांच्या 7.6 कोटींच्या मालमत्तेवर टाच.
- माजी परिवहनमंत्री अनिल परब यांचीही अनिल देशमुखप्रकरणी चाैकशी
ईडीच्या कचाट्यात अडकलेले शिंदे गटाचे नेते
अर्जुन खोतकर, माजी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार, भावना गवळी, खासदार यशवंत जाधव – मुंबई महापालिकेचे स्थायी समिती माजी अध्यक्ष