अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने आयोजन
पुणे :
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅम (अटल एफडीपी )चे आयोजन करण्यात आले होते. २० ते २४ सप्टेंबर दरम्यान होत असलेल्या या प्रशिक्षणाचे उदघाटन सोमवारी बंगळुरूच्या जैन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राज सिंग यांनी केले.
भारती अभिमत विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर हे या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रॉग्रॅमच्या अध्यक्षस्थानी आहेत. १४ मान्यवर व्याख्याते मार्गदर्शन करीत असून देशभरातून २०० जण उदघाटन समारंभाला उपस्थित होते.
सुब्रह्मण्यम नाडर,डॉ.अर्चना ठोसर,डॉ संतोष बोठे,डॉ.ए.पवार,प्रा.बी. कोटेश्वर नाईक,डॉ. मनोज शर्मा ,डॉ आनंद नाडकर्णी,डॉ. देबनाथ,डॉ मधुशा ,डॉ अमित आंद्रे ,डॉ. शरद जोशी,डॉ. जयंत ओक यांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत .डॉ प्रमोद पवार ,डॉ श्रद्धा वेर्णेकर ,डॉ.दीपक नवलगुंद ,डॉ श्याम शुक्ल ,डॉ बलजित कौर,डॉ सोनाली खुरजेकर ,डॉ स्वाती देसाई ,डॉ भारती जाधव ,डॉ रणप्रीत कौर ,डॉ आर व्ही महाडिक यांनी संयोजन केले.
डॉ राज सिंग म्हणाले ,’देशाच्या प्रगतीसाठी संशोधन अतिशय आवश्यक असून विद्यापीठांनी त्यात अधिक योगदान दिले पाहिजे ,नाविन्यपूर्ण संकल्पनांची अधिकाधिक पेटंट घेतली पाहिजेत. संयुक्तपणे होणाऱ्या संशोधनाला उत्तेजन दिले पाहिजे. उद्योग क्षेत्र आणि संशोधनाला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त संस्था पुढे आल्या पाहिजेत’.
डॉ सचिन वेर्णेकर म्हणाले,’चांगला प्राध्यापक शिक्षण क्षेत्रांत मोठे योगदान देऊ शकतो . त्यामुळे या वर्गाचे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरते . शैक्षणिक क्षेत्रात आपले ज्ञान सतत अद्ययावत करीत राहिले पाहिजे.अशा प्रशिक्षणातून नाविन्यपूर्ण संकल्पना आणि संशोधनाला उत्तेजन मिळते ‘