छंद वर्गासाठी एकूण सर्च मध्ये २००% ची वाढ: जस्ट डायल कंझ्युमर इनसाईट्स
– टियर१ शहरांपेक्षा टियर २ गावे आणि शहरांमध्ये छंद वर्गासाठी ३५% जास्त सर्च
– देशभरात नृत्य वर्गासाठी सर्वाधिक सर्च
मुंबई, २० जून: या उन्हाळ्याच्या सुट्टीत नृत्य, भाषा आणि संगीतासाठीच्या शिकवणी वर्गाची मागणी वाढल्याचे दिसून आले. कोविडच्या उद्रेकामुळे दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर छंद वर्गाच्या सर्चमध्ये वर्ष दर वर्ष २०९% वाढ झाल्याचे जस्ट डायल कंझ्युमर इनसाईट्सच्या नवीनतम अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नृत्य, भाषा आणि संगीत वर्ग हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे स्थानिक सर्च इंजिन असलेल्या जस्टडायल वर एप्रिल मे २२ या कालावधीत सर्वाधिक शोधले जाणारे पहिले ३ अग्रगण्य छंद वर्ग होते तर पोहणे आणि योगाचे वर्ग पहिल्या पाचामध्ये होते. टियर १ शहरांमधील शोधांमध्ये वर्ष दर वर्ष २०३% ची वाढ झाली तर टियर-२ शहरे आणि गावांमध्ये ते प्रमाण २३२% होते.
या सर्च प्रवाहाबद्दल भाष्य करताना जस्ट डायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्हणाले: “उन्हाळ्यात शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी छंद जोपासण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही आजूबाजूच्या परिसरातील छंद वर्गांची विस्तृत श्रेणी एकत्रित केली आहे. त्यामुळे आमच्या वापरकर्त्यांना सोयीस्कर निवड करण्यात मदत होऊ शकेल. कोविड मुळे असलेल्या लॉकडाऊनच्या मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी या काळात सर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आम्ही सेवा पुरवठादार ऑनलाइन सेवा देण्याच्या प्रमाणामध्येही वाढ पाहत आहोत आणि त्यामुळे जस्टडायल हे सर्व प्रकारच्या छंद वर्गासाठी योग्य व्यासपीठ बनले आहे. टियर १ गावे आणि शहरांमध्ये हा प्रवाह अधिक दिसून येत असून टियर १ च्या तुलनेत येथील सर्च ३५% ने जास्त आहे.”
जस्ट डायलवर नृत्य हा सर्वात जास्त मागणी असलेला छंद वर्ग होता, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू ही सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ३ टियर १ शहरे होती. दिल्लीतील मागणीत सर्वाधिक ५३% आणि कोलकाता ३१ % सह दुसऱ्या क्रमांकावर होते. टियर २ गावे आणि शहरांमध्ये लखनौ, जयपूर, चंदीगड, इंदौर आणि नागपूर सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ शहरे होती.
भाषा वर्गासाठी दिल्ली आणि मुंबईतील मागणीचे प्रमाण टियर-1 शहरांमधून असलेल्या मागणीच्या जवळपास ५०% होते आणि पुणे तिसऱ्या स्थानावर होते. इंदौर, जयपूर, चंदीगड, नागपूर आणि पाटणा ही आघाडीची ५ टियर २ गावे आणि शहरे होती जिथे भाषा वर्गांना सर्वाधिक मागणी होती.
संगीत वर्गासाठीच्या सर्चच्या मागणीत मुंबईने अव्वल स्थान मिळवले आणि टियर १ शहरांमधून झालेल्या एकूण सर्चमध्ये हे प्रमाण २०% होते तर त्यानंतर दिल्ली आणि चेन्नई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते. लखनौ, इंदौर, नागपूर, चंदीगड आणि कोईम्बतूर ही संगीत वर्गाना वाढती मागणी असलेली आघाडीची ५ टियर २ गावे आणि शहरे होती.
वाढत्या तापमानामुळे मुंबईत पोहण्याच्या वर्गांना सर्वाधिक मागणी दिसून आली. मुंबईत जलतरण वर्गासाठी शोध सर्वात जास्त होता आणि टियर १ शहरांमधून झालेल्या मागणीच्या ३०% एवढे हे प्रमाण होते. दिल्ली आणि बंगळुरू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. जयपूर, लखनौ, इंदौर, चंदीगड आणि कोईम्बतूर ही पोहण्याच्या वर्गाना सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ टियर २ गावे आणि शहरे होती.
योगा वर्गासाठी देखील मुंबईने मागणीत अव्वल स्थान पटकावले. टियर शहरांमधून झालेल्या मागणीच्या २५% हून अधिक एवढे हे प्रमाण होते. आघाडीच्या ३ शहरांमध्ये दिल्ली आणि चेन्नई ही शहरे होती. चंदीगड, जयपूर, लखनौ, सुरत आणि इंदौर ही टियर-२ गावे आणि शहरे मागणीत आघाडीवर होती.