मुंबई-गेल्या पाच वर्षात सांस्कृतिक कार्य संचालनालायमध्ये कलावंतांच्या हिताची एकही अशी नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणली नसली , तरी या पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांनी येथील संचालक पदाच्या खुर्चीसाठी अगदी “संगीत खुर्चीच्या” खेळा प्रमाणे आतापर्यत कार्यभार स्वीकारून इतर खात्याचा रेकॉर्ड ब्रेक मोडला. ह्या नवीन पायंड्यामुळे मात्र एकच चर्चा या खात्याबद्दल केली जात आहे.
खात्यात अथवा एखादया महामंडळात किमान दोन वर्षे तरी एखादया अधिकाऱ्याने पूर्ण वेळ काम केले तरच त्यांना एखादी चांगली योजना किंवा धोरणाची अंमलबजावणी करायला सोयीस्कर जाते.परंतु पदभार स्वीकारल्यानंतर अगदी सात आठ महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्ष एखादा अधिकारी काम करून लगेच बदली मागत असेल तर तेथील खालचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामात गांभीर्य घेत नाही.अन योजनांचा बट्ट्याबोळ होतो.
ऑक्टोबर २०१४मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे दिली होती.त्यांनतर त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागात नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यापैकी अनेक योजनांना अधिकारी वर्गाचा तुटवडा असल्याने गती मिळाली नाही.यामुळे महाराष्ट्रातील कलावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
मात्र या सांस्कृतिक कार्य खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालायामध्ये पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांनी “संचालक”म्हणून वर्ष- दिड वर्षा पेक्षा अधिक काळ काम करू शकले नाही. अनेक वेळा बाह्यशक्तीच्या दबावापोटी हे अधिकारी काम करीत होते.त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच संचालनालायाचा निरोप घेतला. असे सध्या सांस्कृतिक iकार्य विभागातील अधिकारी म्हटले जाते. काही सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक कलावंत कार्यक्रम सादरीकरणासाठी पात्र नसेल तरी त्यांना काम देण्यासाठी दबाव येत होता.असे या खात्यातील अधिकाऱ्याचे मत आहे.
२०१४पासून आतापर्यत संचालक पदाचा पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याची नावे पुढीलप्रमाणे..
१) संजय कृष्णाजी पाटील (२८ जुलै २०१४ते २३डिसेंबर२०१४)
२)अजय अंबेकर (२४ डिसेंबर२०१४ ते २मे २०१६)
३)संजय कृष्णाजी पाटील (३मे२०१६ ते १३ जुलै २०१६)
४) शैलेश जाधव(प्रभारी) (१३जुलै २०१६ ते २५ सप्टेंबर२०१६)
५)संजय कृष्णाजी पाटील (२६ सप्टेंबर२०१६ते २०जून २०१७)
६)सुशील गर्जे (२१ जून २०१७ ते २४ जुलै २०११७)
७)संजय कृष्णाजी पाटील (२५जुलै २०१७ ते १० सप्टेंबर २०१७)
८)संजीव पलांडे (प्रभारी) (११ सप्टेंबर२०१७ ते २ ऑक्टोबर २०१७)
९) संजय कृष्णाजी पाटील (३ ऑक्टोबर २०१७ ते ६ डिसेंबर २०१७)
१०)सुशील गर्जे (प्रभारी)। (७डिसेंबर २०१७ ते १६ डिसेंबर २०१७)
११) संजय कृष्णाजी पाटील (१७ डिसेंबर २०१७ ते २२ मे २०१८)
१२) संजीव पलांडे (प्रभारी) (२३ मे २०१८ते १० ऑक्टोबर२०१८)
१३)श्रीमती स्वाती काळे (११ ऑक्टोबर २०१८ते ११ जुलै २०१९)
१४) बिभीषन चवरे (सध्या कार्यरत )