मुंबई:
मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिक वर आता होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं छोटसं पाऊल हे आहे. हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी “हॅशटॅग बाप्पा” हे संकेतस्थळ ब्रँण्डमेकर या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन किंवा एन एफ सी कार्ड च्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण घेवू शकता.
गिरगाव चा राजा चे प्रथम मुखदर्शनछत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत*!
गिरगाव चा राजा चे प्रथम मुखदर्शन प्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांनी मंडळाचे विशेष कौतुक केले, “महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धना महत्त्वाचा विषय घेवून काम करतय. गेली ९५ वर्षे शाडू मातीची मुर्ती आणून पर्यावरणाच संरक्षण केल जातय. “
याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते “हॅशटॅग बाप्पा” ह्या ॲप चे “गिरगावचा राजाचे क्यु आर कोड” चे अनावरण करण्यात आले.
“मुंबईमधील सर्व गणपतीचे दर्शन व मंडळाची सविस्तर माहिती एका क्लिकवर मिळणार म्हणजे आपला उत्सव आणखीन प्रभावीपणे जनमानसांत सहजरित्या पोहचेल,”असे याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले
^ब्रॅण्ड्स मेकर हि संस्था ^हॅशटॅग बाप्पा^ हा उपक्रम मुंबई मध्ये राबवत आहे, मुंबईतील १५० हून अधिक नावाजलेल्या गणपती मंडळानी यामध्ये नोंदणी केली आहे,”अशी माहिती संचालक भरत शिंदे यांनी दिली. यावेळी छत्रपती शासन चँरिटेबल ट्रस्ट चे रमेश शहा, विनायक मेदगे, संतोष पवार , मार्गदर्शक पत्रकार शीतल करदेकर आणि गिरगावचा राजा मंडळाचे सचिव गणेश लिंगायत व कार्यकर्ते उपस्थित होते.