मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२३
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस “सेवा सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सेवा सप्ताहानिमित्ताने मुंबई भाजपातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई स्तरावर करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सरकारी योजना सेल अंतर्गत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पथनाट्याच्या माध्यमातून मुंबतील जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. ओबीसी मोर्चा अंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाचे २३ ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या योजना संदर्भातील कार्यक्रम रंगशारदा, बांद्रा पश्चिम येथे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि खा. पूनम महाजन यांच्या उपस्थित होणार आहे. युवा मोर्चा अंतर्गत २० ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. दहिसर विधानसभा आ. मनीषाताई चौधरी यांच्या माध्यमातून बेबी बॅगचे दहिसर विधानसभेत वाटप करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभेत आरोग्य शिबिर व आयुष्यमान भारत कार्डचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. कांदिवली पूर्व विधानसभा आ. अतुल भातखळकर यांच्या मार्फत मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत प्रत्येक बूथश: व शक्ति केंद्र स्तरावर रथ यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह अंतर्गत विविध सेवा प्रकल्प घेण्यात येणार आहेत अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांनी दिली आहे.