’रामायण-महाभारत व भारतीय संस्कृतीचे’ दर्शन श्रीमती इंदीरा व राजीव गांधीं मुळे ‘काँग्रेस काळांत’ देशवासीयांना घरा – घरांत घडले..!
मुंबई – देशांत सर्व धर्मियांची मते घेऊन, लोकशाही मार्गाने आलेल्या भाजपच्या ‘भाषणजीवी नेतृत्वाने’ सर्वप्रथम लोकशाही मुल्यांचा आदर करणे व ‘संविधानीक राजधर्माचे’ पालन करणे गरजेचे असुन, सनातन धर्माचा प्रचार व प्रसार ‘संविधानीक पद’ सोडुन करावा. प्रसंगी शंकराचार्यांकडुन दिक्षा घ्यावी, त्या करीता ‘पंतप्रधान पदाची’ आवश्यकता नाही, असे खडे बोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सुनावले.
काल एका सरकारी कार्यक्रमात पंप्र मोदींनी इंडीया आघाडीवर ‘सनातन धर्म नष्ट करण्याचे’ कथित आरोप केले होते..!
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी पुढे म्हणाले की, १९८० ते ९० च्या दशकांतच, पुर्वीच्या ‘सर्वधर्म समभाव मानणाऱ्या व संविधानाची बुज राखणाऱ्या “काँग्रेस प्रणीत सरकारांनी” तत्कालीन पंतप्रधान स्व इंदीरा गांधी व नंतर राजीव गांधी पंतप्रधान असतांना, देशात दुरचित्रवाणी (टीव्ही) आणुन, लेखक – दिग्दर्शक रामानंद सागर यांचे कडुन टीव्ही सिरियल द्वारे, सरकारी ‘दुरदर्शन चॅनेल वरून’ दर रविवारी स.१० वा. ’रामायण व महाभारता’चे (अनुक्रमे ८८ व ९५ एपिसोड च्या) ”माध्यमातुन भारतीय ईतिहास व संस्कृतीचे दर्शन देशवासीयांना घडवले होते, याचे स्मरण करून देतांना गर्व वाटतो. त्यावेळी देखील तत्कालीन ‘धर्मनिरपेक्ष पंतप्रधान’ मा राजीव जी गांधी वा काँग्रेस’ने कुठे ही हिंदुत्वाचा वा सनातन धर्माचा ढोल पिटला नव्हता तर हिंदु धर्मास अपेक्षीत ‘संविधानीक राजधर्मांच्या’ कर्तव्यांचीच् सतत पुर्तता’ केली होती अशी पुस्तीही त्यांनी जोडली..!
मोदीजी वारंवार संविधानीक संकेत पायदळी तुडवत, सरकारी कार्यक्रमातुनच, राजकीय निशाणे साधत.. राजकीय प्रचाराचा एकहाती अजेंडा राबवतात.. वास्तविक सरकारी माध्यमातुन व सरकारी खर्चाने देशभर टेलीकास्ट होणाऱ्या कार्यक्रमातुन…”सरकारच्या योजना, प्रगतीची आकडेवारी वा लक्ष्यप्राप्ती” इ विषयी सांगितले पाहीजे..! मात्र सत्ताधिशांचे ठायी स्वकर्तुत्वाचा दुष्काळ असल्याने.. सतत ‘प्रचारी भुमिकेतच’ भाषणजीवी असल्याचे पहायला मिळते. अशी टिका देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.