● एप्रिल 2020 मध्ये सुरू झालेल्या लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन या प्रोग्राममुळे देशभरातील विक्रेत्यांना विकासाची मोठी मदत झाली आणि व्यवसायात सातत्य ठेवणे तथा त्यांच्या भागातील नसलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधीही त्यांना मिळाली
●महाराष्ट्रातून या प्रोग्रामला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, कपडे, होम अँड किचन, हेल्थ अँड पर्सनल केअर, इलेक्ट्रॉनिक्स, बुक्स अँड टॉईज आणि अशा विविध प्रकारांतील दुकानदारांनी या प्रोग्राममध्ये सहभाग घेतला आहे.
प्रतिनिध लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन बदल घडवण्यामध्ये पुण्याचा क्रमांक अव्वल आहे. किचन, ग्रोसरी, इलेक्ट्रॉनिक्स, इन्व्हेंटर बॅटरीज, होम फर्निचर आणि इतर अशा अनेक प्रकारांमध्ये पुण्यातील लोकल शॉप मालकांनी ॲमेझॉनच्या लोकल शॉप्स ऑन प्रोग्राममध्ये सहभाग घेतला आहे.
या प्रोग्रामची सुरुवात 2020 मध्ये करण्यात आली होती. आता हा प्रोग्राम 344 शहरातील 3 लाखांहून अधिक रिटेलर्स पर्यंत पोहोचला आहे. हा प्रतिसाद केवळ मेट्रोसिटीमध्ये नाही तर मध्यम आणि छोट्या शहरांतही चांगला प्रतिसाद मिळू लागलेला दिसून येतो आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई, पुणे, नागपूर, सातारा आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉनचे जाळी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातील 35 हजारांहून अधिक दुकानदारांनी या योजनेत सहभाग घेतल्याचे दिसून येते. या लोकल शॉप्स ऑन ॲमेझॉन प्रोग्राममुळे ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेतेही मिळत असून त्यामुळे किचन, कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, मेजर अप्लायन्सेस, होम आणि फर्निचर अशा विविध वर्गातील उत्पादने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली आहेत.
भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. वस्तूंना, उत्पादनांना वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे लोकल शॉप मालकांना आपला व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने वाढवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. नुकताच साजरा करण्यात आलेल्या ॲमेझॉन प्राईम डेट 2023 मध्ये छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायात मोठी विक्री पहायला मिळाली आहे. ॲमेझॉन डॉट इन या वेबसाईटवर प्रत्येक सेकंदाला वीस ऑर्डर मिळत होत्या. 90 हजारांहून अधिक छोटे आणि मोठ्या विक्रेत्यांना या ऑर्डर्स मिळाले आहेत. भारतातील 19000 हून अधिक पिन कोड असलेल्या ठिकाणी या ऑर्डर्सचा फायदा व्यवसायिकांना झाला आहे.
ॲमेझॉन इंडियाच्या लोकल शॉप्स विभागाचे प्रमुख अभिषेक जैन म्हणाले की, लोकल शॉप्स ऑन अमेझॉन प्रोग्राममुळे पुण्यात प्रचंड प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते आणि ते मला खऱ्या अर्थाने प्रेरित करते. या बदलाचे प्रतिबिंब स्थानिक दुकान मालकांमधील उत्साहातून दिसून येते. ॲमेझॉनचे विविध टूल्स आणि सहकार्य यांच्या माध्यमातून ऑफलाइनपासून ते ऑनलाईनपर्यंतचा त्यांचा प्रवास हे एक प्रकारे डिजिटल कॉमर्समध्ये अमर्यादित संधी असल्याचे द्योतक आहे. ऑफलाइन दुकानदारांना ई-कॉमर्स चा फायदा करून देण्याचा आम्हाला अभिमान आहे. या ई कॉमर्समुळे या छोट्या दुकानदारांना आणि मध्यम आकाराच्या दुकानदारांना त्यांच्या भागात नसलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या क्रांतिकारी बदलांमध्ये पुणे आघाडीवर आहे. या डिजिटल युगात स्थानिक व्यवसाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरारी घेत असताना पाहणे आनंदाचे आहे.
ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांनीही आणि गावोगावच्या दुकानदारांनी डिजिटल व्यवसायिक झाल्याबद्दल तंत्रज्ञानाचे कौतुक केले
पुण्यात संतोष माने यांचे कॅप्टोई नावाचे चपला-जोड्यांचे प्रसिद्ध दुकान आहे. लोकल शॉप्स ऑन अमेझॉन या प्रोग्राममध्ये महाराष्ट्रातील 35000 हून अधिक रिटेलर्स आणि दुकानदार सहभागी झाले आहेत, त्यात संतोष माने यांच्या दुकानाचाही समावेश आहे. या उपक्रमामुळे किरकोळ ऑफलाईन विक्रेत्यांनाही ई-कॉमर्स चा फायदा घेता येत आहे. ॲमेझॉन डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून ते डिजिटल माध्यमातून उपलब्ध झाले आहेत आणि त्यामुळे त्यांचा विस्तार वाढला आहे. ग्राहकांना आता पुण्यातील त्यांच्या विश्वासार्ह आणि आवडीच्या दुकानातून उत्पादने घरी बसून खरेदी करता येऊ लागली आहेत. छोटे स्थानिक दुकाने आता डिजिटल स्टोअर्स बनली आहेत आणि विक्रेत्यांना त्यांची उत्पादने त्यांच्या भागात नसलेल्या ग्राहकांनाही विकता येऊ लागली आहेत. त्यांना सेवा देता येऊ लागली आहे. याशिवाय या स्थानिक दुकानदारांना इझी शिफ्ट आणि सेलर फ्लेक्स अशा विविध ऍमेझॉनच्या योजनांचाही फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात वाढ होऊ लागली आहे. याचा फायदा केवळ पुण्यात नाही तर देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या छोट्या दुकानदारांनाही होत आहे.
संतोष माने यांनी आपली प्रेरणादायी कहाणी सर्वांसमोर मांडली. 2018 मध्ये त्यांनी बूट तयार करणे आणि ते विकणे याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये ॲमेझॉनवर आपल्या उत्पादनांची विक्री करणे सुरू केले. एकीकडे त्यांचा स्थानिक किरकोळ व्यवसाय सुरू होता आणि दुसरीकडे ॲमेझॉनवर विक्रीही सुरू होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या भागात नसलेल्या ग्राहकांपर्यंतही पोहोचता आले आणि त्यांचा व्यवसाय नव्या उंचीवर नेता आला.
ऑनलाइन मार्केट प्लेसवर सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय अभूतपूर्व ठरला आणि त्यातून सकारात्मक बदल पाहायला मिळाला. ॲमेझॉनच्या सजेशन टूल आणि व्यवस्थापनाबद्दल माने यांनी समाधान व्यक्त केले. ॲमेझॉनमुळे कोणत्या उत्पादनांना मागणी आहे, याबद्दल ठरवणेही त्यांना सोपे गेले. त्यांच्या एका पावलामुळे त्यांच्या उत्पादनांची विक्री आणि ते अनेकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाणही वाढले. केवळ पुण्यात नाही तर महाराष्ट्रभरात त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढली. दीड वर्षांमध्ये त्यांच्या व्यवसायात खास करून महिला आणि पुरुषांच्या पादत्राणे विक्रीत 60% ची वाढ झाल्याची पाहायला मिळाली. संतोष माने यांनी या यशाचे सर्व श्रेय लोकल शॉप टीमला दिले. ॲमेझॉनच्या या लोकल शॉप टीमने त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते आणि त्यांना सहकार्यही केले होते. असेच सहकार्य ही टीम छोटे व्यवसायिकांना करत त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असते. या सहकार्यामुळे माने यांचा व्यवसाय एका नव्या उंचीवर गेला.