सिंधुदुर्गनगरी – आपला सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहेत जेणेकरून देश विदेशातील पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येतील. विदेशात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे थीम पार्क करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हे देश पर्यटनावर चालतात अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा प्रयोग केल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील केसरी फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल एक्वेरियम उभारण्यात आले आहे. आज या भव्य प्रकल्पाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वडील दत्तात्रय चव्हाण आई शुभांगीनी चव्हाण यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
श्री चव्हाण पुढे म्हणाले परदेशात जाऊन आपण जे पाहतो त्या गोष्टी नजीकच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहता याव्यात यासाठी लवकरच पर्यटनाला चालना देणारे लवकरच बर्ड पार्क, फुलपाखरू गार्डनसह
विविध उपक्रम केएसआर ग्लोबल एक्वेरियमच्या माध्यमातून उभारण्यात येतील असेही ते म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुंदर असे एक्वेरियम उभारले आहे.त्यांच्या कित्येक वर्षाच्या मेहनतीला हे यश आले आहे याबाबत त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करत आहे आज आजी आजोबा दिन आहे अशा वेळी या भव्य प्रकल्पाचा शुभारंभ श्री चव्हाण यांनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते केला हे पर्यटन स्थळ निश्चितच प्रसिध्द होईल याची मला खात्री आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नीलक्रांती तूनअनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत यानिमित्ताने त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे याबाबत पालकमंत्री चव्हाण यांच्या चांगल्या कार्याचे मनापासून कौतुक करत असल्याचे श्री केसरकर यांनी सांगितले.