शुक्रवारी चंद्रग्रहणाचे वेध दुपारी १२ पासून -दुपारी १२पूर्वी गुरूपूजन कराः पं.वसंतराव गाडगीळ
पुणे, २५ जुलै: येत्या शुक्रवारी (दि. २७ जुलै) गुरूपौर्णिमा शंभर वर्षातील अशा प्रकारच्या पहिल्याच खग्रास चन्द्र ग्रहणाने ग्रस्त असल्यामुळे, ग्रहण मध्यरात्री १२ ते पहाटे ४ पर्यन्त असले तरी त्याचे वेध (पूर्व परिणामांची दोषग्रस्तता) शुक्रवारी दुपारी १२ पासून सुरू होत आहे. यालाच वेधकाळ (दुपारी १२ ते रात्री १२) म्हणतात. यामुळे गुरूपूजन प्रसादग्रहण हे कार्यक्रम वेधकाळा पूर्वीच (दुपारी १२ पूर्वी ) सर्वांनी संपन्न करावेत आणि पावित्र्य पाळावे असे आवाहन शारदाज्ञानपीठमचे संस्थापक एमआयटी विश्वशान्ति विद्यालयाचे कुलाचार्य पं. वसंतराव गाडगीळ यांनी केले आहे. याला अपवाद फक्त वृद्ध, रुग्ण, लहान शिशूना असून त्यानी सायं. ५ पर्यन्त हलका आहार घ्यावा, असे ही त्यांनी सांगितले.