नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.धोनीच्या निवृत्तीबाबत एएनआय या वृत्तसंस्थेनं बातमी दिली आहे. तसेच धोनीने स्वत: इस्टांग्रामवर एक व्हिडीओ आणि पोस्ट करत याबदल माहिती दिली आहे.
महेंद्र सिंग धोनी हा गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची मॅच खेळला होता. यानंतर धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये धोनी दिसला नव्हता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. पण, आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून धोनीने शनिवारी (15 आॅगस्ट 2020) इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घेत असल्याची घोषणा केली आहे.
तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार…
धोनी पहिला असा खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळा आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला. धोनीबदल सांगायचे झाले तर, तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने एक दिवसीय विश्वचषक (2011), टी-20 विश्वचषक (2007) या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले होते. तसेच त्याने 2007 मध्ये भारतास चॅंपियन चषक स्पर्धेतही अजिंक्यपद मिळवून दिले आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीनवेळा विजेतेपद पटकावलं आहे.
कसोटी क्रिकेटमधून धोनीने 2014 मध्ये निवृत्ती घेतली. त्याआधी त्याने 90 सामन्यात 6 शतके आणि 33 अर्धशतकांसह 4 हजार 876 धावा केल्या होत्या. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 350 सामन्यात 10 हजार 773 धावा केल्या असून यामध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारात त्याने 98 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1 हजार 617 धावा केल्या आहेत.