▪ परदेश प्रवास करून पुणे येथे परत आलेल्या प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून आली नसल्यास पुढील १४ दिवसांसाठी त्यांना त्यांचे राहत्या घरी विलगीकरण स्वरूपात (Home Quarantine ) राहण्यासाठी सुचित करण्यात आले होते.
▪ परंतु विलगीकरण कक्षात राहण्याची सुचना दिलेल्या काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याच्या घटना राज्यात काही ठिकाणी निदर्शनास आल्याने पुणे शहरातील अशा व्यक्ती घरी असल्याची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने पुणे पोलिसांना सुचित केले.
▪ पुणे शहरात विलगीकरण कक्षाची शिफारस केलेल्या १२७६ व्यक्तींची पडताळणी करण्यासाठी १५२ पोलीस पथके स्थापन करण्यात आली.
▪ प्रत्येक पथकात दोन कर्मचारी असून त्यांना आवश्यक सुविधा ( ग्लोव्हज, मास्क व सॅनिटायझर ) उपलब्ध करून देण्यात आल्या.
▪ दि. २२ मार्च २० रोजी सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन तो हजर असल्याची खातरजमा केली.
▪ दुसऱ्या टप्प्यात घरी मिळून आलेल्या ८२१ व्यक्तींचा दररोजचा संपर्क टाळण्यासाठी त्यांना पोलीसांनी whats app video call करुन त्यांचे घरातील विशिष्ठ जागेवर उभे राहून उत्तर द्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
▪ या व्यक्ती घराबाहेर पडतात का? याची खातरजमा करण्यासाठी शेजारी कुटुंबाची निगराणीकामी मदत घेण्यात येत आहे.
▪त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे घरी जावे लागणार नसल्याने प्रत्यक्ष संपर्कातुन संसर्ग टाळणे सहज शक्य होणार आहे.
▪पोलीसांनी घरी जाऊन / Video Call यांतून संशयितांच्या मागावर राहण्यासाठी होणारे श्रम व वेळ यांत बचत व्हावी, त्यापेक्षाही पोलीस कर्मचाऱ्यांना संसर्गाची मुळीच शक्यता राहू नये यासाठी कोटा व्हिजन लॅब, बेंगलोर यांच्या मदतीने Facial Recognition system आधारित संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे..
▪हे अॅप http://106.51.74.239:8083 / download_apk या वेबसाईटवरुन कार्यान्वित करु शकतो.
▪ विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडील संकलित केलेली माहितीनुसार सर्व संबंधितांना नमूद वेबसाईट वर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यासाठी SMS करण्यात आले आहेत.
▪या प्रणालीनुसार संशयितांला विशिष्ठ ठिकाणी उभे राहून / घडयाळाचे समोर सेल्फी फोटो अॅपवर अपलोड करावा लागणार आहे.
▪ त्याचवेळी सदर ठिकाणचे भौगोलिक अक्षांश / रेखांश स्थान नोंदवले जाणार आहे.
▪या प्रणालीत सदर व्यक्तीने दिवसात सकाळी ८ वा. पासून रात्री १० वा. पर्यंत किमान २ वेळा आपला फोटो अपलोड करावा लागणार असून तसे न केल्यास त्याची अनुपस्थिती तात्काळ पोलीसांना उपलब्ध होईल. मगच पोलीस निर्देशित पद्धतीने त्याची पडताळणी करतील.
▪ सदर अॅप गुगल प्लेस्टोअरवरून उपलब्ध करण्याची कार्यवाही पण चालू आहे.
▪ पुणे पोलीसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विलगीकरण केलेल्या शहरातील संशयित कोरोना संसर्गित व्यक्तींवर बारकाईने व बिनचूक निगराणी ठेऊन कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी दक्षतेचे पाऊल उचलले आहे.
▪या अॅपची उपयोगिता लक्षात घेऊन राज्यातील अनेक जिल्ह्यांत या प्रणालीचा वापर होणार होणार आहे.