मराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे
-मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई, दिनाकं 28 जानेवारी;
मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतांनानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता आज झाली त्यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या 34 पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीत डिसले उपस्थित होते.
श्री. देसाई पुढे म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मीती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे तर मैत्रीपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे आहे.
पंधरवडाच्या सुरवातीला मांडलेली मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात लोकांच्या पसंतीस उतरली आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच प्रमाणे मराठी भाषेतुन स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय आहे. असेही श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
मराठीचा प्रचार आणि प्रसारासाठी समाज माध्यमाचा वापर- प्राजक्ता लवंगारे
मराठी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा. यासाठी मराठी विभाग कार्यरत असून मराठीचा वापर जास्तीत जास्त समाज माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच एरोली येथील उपकेंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. असे मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगरे, यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषा पंधरवड्याच्या सुरुवातील मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात यावे अशी सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली
नविन शब्दांचा समावेश करावा- रणजीत डिसले
सन 2020 चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले म्हणाले, मराठी भाषा पंधरावडा यामध्ये सुधारणा करुन मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करण्यात यावा अशी सूचना त्यानी यावेळी केली. समाज माध्यमावर मराठी भाषेचे चाहाते कमी असून समाजमाध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जावा.तसेच नवीन शब्दाचा मराठी भाषेमध्ये वापर करण्यात यावा, असा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मराठी भाषा पंधरवडा निमित्त मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, विश्व कोश व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध कलावंताने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. त्याबद्दल विधीमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविले जावेत. यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मंत्रालयातील लेखकांचे साहित्य प्रदर्शन
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रदर्शनाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्टॉला भेट देवून पाहणी केली. गोपाळ वाकोडे, सुलतानपूर, जिल्हा बुलढाणा हे मंत्रालयीन अधिकारी /कर्मचारी यांना मराठी भाषेतील त्यांच्या स्वाक्षरीचे पाच नमुने मंत्री श्री. देसाई यांना दाखवले. त्यांनी प्रदर्शनाला भेट देवून समाधान व्यक्त केले.
अभिवाचन व साहित्ययात्री स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण
अभिवाचन स्पर्धेतील विजेते संदीप जाधव, निलीमा जाधव, सोनल स्मिथ पाटील, वासंती काळे, शिल्पा नातू यांना तसेच साहित्य यात्री प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन 2019
महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. छाननी अंती राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी पात्र ठरलेली पुस्तके परीक्षणार्थ व शिफारशी करण्याकरीता परीक्षकांकडे सोपविण्यात येतात. स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराकरीता पात्र ठरलेल्या साहित्यिकांना प्रदान करावयाच्या पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) व कमीत कमी रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) इतकी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार या योजनेअंतर्गत 2019 च्या पुरस्कार स्पर्धेसाठी एकूण 1073 प्रवेशिका मंडळास प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 84 प्रवेशिका राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे छाननी समितीने बाद ठरविल्या. छाननी अंती राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी पात्र ठरलेली 989 पुस्तके परीक्षणार्थ व शिफारशी करण्याकरीता परीक्षकांकडे सोपविण्यात आली होती. परीक्षण समितीतील परीक्षकांच्या निर्णयानुसार त्यांनी शिफारस केलेल्या सन 2019 या वर्षाकरिता राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येत असलेल्या लेखक / साहित्यिक यांच्या नावांचा निकाल सविस्तर विवरणपत्रासह महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावर्षी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2019 च्या स्पर्धेसाठी प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या वाङ्मय प्रकारामध्ये परीक्षकांनी पुरस्कारसाठी एकाही पुस्तकाची शिफारस केलेली नाही.
कोवीडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र पुरस्काराकरिता पात्र साहित्यिकांना थेट घरपोच प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात येईल.
पुरस्कार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
सन 2019 या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी
- प्रौढ वाङ्मय – काव्य कवी केशवसूत पुरस्कार 1,00,000/- मंगेश नारायणराव काळे मायावीये तहरीर पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई
- प्रथम प्रकाशन – काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार 50,000/-संदीप शिवाजीराव जगदाळे असो आता चाड लोकवाङ्मय गृह, मुंबई
3.प्रौढ वाङ्मय – नाटक/एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार 1,00,000/- शफाअत खान गांधी आडवा येतो पॉप्युलर प्रकाशन, मुंबई - प्रथम प्रकाशन – नाटक/एकांकिका विजय तेंडूलकर पुरस्कार 50,000/- अनुप जत्राटकर निष्पर्ण पिंपळाच्या छायेत तेजस पब्लिकेशन, कोल्हापूर
- प्रौढ वाङ्मय – कादंबरी हरी नारायण आपटे पुरस्कार 1,00,000/- मनोज बोरगावकर नदीष्ट ग्रंथाली, मुंबई
6.प्रथम प्रकाशन – कादंबरी श्री.ना.पेंडसे पुरस्कार 50,000/- ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यसन स्वयंदीप प्रकाशन, पुणे - प्रौढ वाङ्मय – लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार 1,00,000/- धर्मराज निमसरकर हुंदक्यांची काहिली दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
- प्रथम प्रकाशन – लघुकथा ग.ल.ठोकळ पुरस्कार 50,000/- डॉ. विजय जाधव अस्वस्थ तांडा ग्रंथाली, मुंबई
- प्रौढ वाङ्मय – ललितगद्य (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार 1,00,000/- नयना सहस्त्रबुद्धे स्त्रीभान अमेय प्रकाशन, पुणे
- प्रथम प्रकाशन – ललितगद्य ताराबाई शिंदे पुरस्कार 50,000/- डॉ. ऐश्वर्या रेवडकर बिजापूर डायरी साधना प्रकाशन, पुणे
- प्रौढ वाङ्मय – विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 1,00,000/- प्रा.अनिल सोनार गझल मिस्किली रजत प्रकाशन, औरंगाबाद
- प्रौढ वाङ्मय – चरित्र न.चिं.केळकर पुरस्कार 1,00,000/- अनीता पाटील सूर्यकोटि समप्रभ द्रष्टा अणुयात्रिक डॉ. अनिल काकोडकर मनोविकास प्रकाशन,पुणे
- प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 1,00,000/- अशोक राणे सिनेमा पाहणारा माणूस संधिकाल प्रकाशन, भाईंदर
- प्रौढ वाङ्मय – समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 1,00,000/- नीलिमा गुंडी गतकाळाची गाज मौज प्रकाशन गृह, मुंबई
- प्रथम प्रकाशन – समीक्षा सौंदर्यशास्त्र रा.भा.पाटणकर पुरस्कार 50,000/- शिफारस नाही
- प्रौढ वाङ्मय – राज्यशास्त्र/समाजशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 1,00,000/- डॉ. हमीद दाभोलकर विवेकाच्या वाटेवर राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
- प्रौढ वाङ्मय – इतिहास शाहू महाराज पुरस्कार 1,00,000/- गोपाळ चिप्पलकट्टी प्राचीन भारतीय संस्कृती: मूलाधारांच्या शोधात सदामंगल पब्लिकेशन, मुंबई
- प्रौढ वाङ्मय – भाषाशास्त्र/व्याकरण नरहर कुरूंदकर पुरस्कार 1,00,000/- खंडेराव कुलकर्णी मराठी व्याकरण : स्वरूप व चिकित्सा पद्मगंधा प्रकाशन, पुणे
- प्रौढ वाङ्मय – विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार 1,00,000/- डॉ.व्ही.एन.शिंदे आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया अक्षर दालन, कोल्हापूर
- प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह वसंतराव नाईक पुरस्कार 1,00,000/- रमेश जाधव पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद साधना प्रकाशन, पुणे
- प्रौढ वाङ्मय – उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 1,00,000/- डॉ. श्रीपाल सबनीस आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
- प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन सी.डी. देशमुख पुरस्कार 1,00,000/- डॉ. गुरूदास नूलकर अनर्थशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण आणि विषमता मनोविकास प्रकाशन,पुणे
- प्रौढ वाङ्मय – तत्त्वज्ञान व मानसशास्त्र ना.गो. नांदापूरकर पुरस्कार 1,00,000/- मनीषा बाठे रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट एक तौलनिक मागोवा समर्थ मिडिया सेंटर, पुणे
- प्रौढ वाङ्मय – शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 1,00,000/- परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर शिक्षणकोंडी रोहन प्रकाशन, पुणे
- प्रौढ वाङ्मय – पर्यावरण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 1,00,000/- अच्युत गोडबोले अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठयावर ? मनोविकास प्रकाशन, पुणे
- प्रौढ वाङ्मय – संपादित/ आधारित रा.ना.चव्हाण पुरस्कार 1,00,000/- संपादक श्याम माधव धोंड कवी अनिल यांची संपूर्ण कविता विजय प्रकाशन, नागपूर
- प्रौढ वाङ्मय – अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार 1,00,000/- अनुवादक माधव वझे प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
- प्रौढ वाङ्मय – संकीर्ण (क्रीडासह) भाई माधवराव बागल पुरस्कार 1,00,000/- डॉ. सुरेश हावरे शिदोरी राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
- बालवाङ्मय – कविता बालकवी पुरस्कार 50,000/- विलास कांतीलाल मोरे शाळेला सुट्टी लागली रे ss दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
- बालवाङ्मय – नाटक व एकांकिका भा.रा. भागवत पुरस्कार 50,000/- सुनंदा गोरे नवी प्रतिज्ञा गोदा प्रकाशन, औरंगाबाद
- बालवाङ्मय – कादंबरी साने गुरूजी पुरस्कार 50,000/- बबन मिंडे दौलतबंकी आणि त्याचा खजिना राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
- बालवाङ्मय – कथा ( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह) राजा मंगळवेढेकर पुरस्कार 50,000/- स्वाती राजे शोध रोहन प्रकाशन, पुणे
- बालवाङ्मय – सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे) यदुनाथ थत्ते पुरस्कार 50,000/- विजय तांबे बबडू बँकेत रोहन प्रकाशन, पुणे
- बालवाङ्मय – संकीर्ण ना.धो. ताम्हणकर पुरस्कार 50,000/- आशा बोकील अनंत तिची ध्येयासक्ती : बचेंद्रीपाल आशा बोकील, पुणे
- सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार 1,00,000/- अदिती बर्वे सौदीतले दिवस पद्मगंधा प्रकाशन, पुणे